आंधळी गावातील पुलाची दुरावस्था

739

आंधळी गावातील पुलाची दुरावस्था

 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

पत्रकार अतुल धनदास खरात

आंधळी तालुका माण जिल्हा सातारा या ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावून बरीच गावांमध्ये शेतीत नुसकान झाले आहे. त्याच बरोबर आंधळी गावातून ते आंधळी पाटी पर्यंत जाणारा रस्ता नव्याने तयार होत आहे. नदीच्या रस्त्याची खूप वाईट परिस्थिती दिसून येत आहे, नव्याने काम झालेले कामाची खूप वाईट परिस्थितीत दिसून येत आहे. त्या कामाची कोणत्याही प्रकारचे आंधळी गावातील लोकांना सुविधा  मिळत नाही पूर आल्यावर  पुलावरून तीन ते चार फूट उंचीचे पाणी पुलावरून वाहते पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता खच्चीकरण झाला आहे. तर रस्त्याची कामे योग्यरीतीने व्हावीत आशा कामामुळे आंधळी गावातील लोक संतप्त झाले आहेत नदीवरचा पूल असून  कसल्याही प्रकारे त्याचा फायदा होत नाही. असे दिसून येत आहे लोकांच्या बोलण्यातून असे येते की पावसाळ्यात या काळामध्ये या पुलाची दुरवस्था वाढतच जाते पण सुधारत नाही अशाप्रकारे दुरावस्था वाढत राहिली तर नदीच्या अलीकडे पलीकडे जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते पुल असून काही कामाचा नाही पूर परिस्थिती मध्ये पुलाच्या नळ्या सर्व ब्लॉक होतात व पूर परिस्थिती आणखीनच भयंकर होते यामुळे वाडी वस्ती वरील लोक खुपच संतप्त झालेले आसतात यावर प्रशासनाने लवकरच दखल घ्यावी अशी लोकांची मागणी आहे.