Home आरोग्य सिरसपेठ मधील गटारीचे दूषित पाणी विहिरीत गेल्याने जनतेमध्ये रोष : आम आदमी...

सिरसपेठ मधील गटारीचे दूषित पाणी विहिरीत गेल्याने जनतेमध्ये रोष : आम आदमी पार्टीचे मनपाला निवेदन

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5328 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

201 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल – नागपूर शहर प्रतिनिधी – मध्य नागपूर मधील प्रभाग 18 ए सिरसपेठ मधील डॉ. वानस्कर यांच्या घरा समोरील लिकेज गटारी मुळे विहिरीला गटारीचे दूषित पाणी झिरपून परिसरात मोठ्या प्रमाणात रोगाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे नित्यानंद बाबा मंदिर समोर श्री. तलमले यांच्या घरी सुद्धा अशाच प्रकारे गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात झिरपत आहे. या गंभीर समस्ये मुळे परीसरात रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे व नागरिकांमध्ये अत्यंत रोष आहे. ही जनसमस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी मध्य नागपूर तर्फे मनपा सहआयुक्त गांधीबाग झोन ला निवेदन देण्यात आले व तातडीने या समस्येची पाहणी करून संपूर्ण समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा आम आदमी पार्टी नागपूर तर्फे महानगर पालिका विरूद्ध तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ युवा आघाडी संयोजक पियुष आकरे, नागपूर शहर युवा आघाडी अध्यक्ष गिरीष तितरमारे, मध्य नागपूर अध्यक्ष नीलेश गहलोत, भूषण ढाकुलकर, सचिव नागपूर शहरसहित समस्त आप मध्य नागपूर विधानसभा कार्यकर्ता उपस्थित होते.