नाभिक समाजाच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले याची 385 वी जयंती साजरी

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5322 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

503

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल – नागपूर शहर प्रतिनिधी : शिवरत्न जिवाजी महाले
याची 385 वी जयंती नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली
स्वराज्याची धुरा ज्यानी स्वत:च्या खांधावर घेऊन वेळ प्रसंगी मृतयूलाही जे समोर गेले अशा अनेक मावळयांच्या कर्तुत्वातून शिवरायांनी भुमिपुत्रांचे स्वराज्य उभे केले . त्यापैकीच एक विर योद्धा म्हणजे शुरवीर शिवरत्न जिवाजी महाले होय नऊ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदीन होय.
जिवाजी महाले यांच्या निष्ठेमुळेच शिवरायांनी अफजलखाना सारख्या शत्रु व कृष्णा भास्कर सारखा देशद्रोही सहज संपवला. तसेच जिवाजिंनी सय्यद बंड सारखा अफजलखानाचा अत्यंत चपळ अंगरक्षक संपवृन शिवरायांचे प्राण वाचवले
सय्यदाचा वार जिवाजीने आपल्या अंगावर घेत अडविला आणि सपकन घाव घालुन सय्यद बंडाच्या चिरफाळ्या केल्या . तेव्हा पासुनच ” होते जिवाजी म्हणून वाजले शिवाजी ” हा वाक्य प्रचार रुढ झाला. सुरतेच्या स्वारीतही जिवाजींनी महाराजांना वाचवल्यांची नोंद आहे.
याच प्रेरणेतुन नाभिक युवा शक्ती सर्वसमावेशक संघटन महाराष्ट्र राज्य शाखा – जिल्ह‍ा नागपुर प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र अमोल तळखंडे,सचिव प्रविण चौधरी , कार्याध्यक्ष विजय मानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.9-10-2020 रोजी शिवतिर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाल येथे जिवाजी महाले यांची जयंती आनंदाने साजरी करण्यात आली प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व जिवाजी महाले याच्या प्रतीमेला पुष्पमाळ संघटने तर्फे अर्पण करण्यात आली. या वेळी प्रदेश अध्यक्ष अमोल तळखंडे यानी आपले मत व्यक्त करत म्हणाले नाभिक समाज हा अत्यंत मैहनती व धाडशी आहे. स्वराज्याकरिता नाभिक समाजाच्या महापुरुषानी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्याच्या महान कार्याची माहिती सर्व नाभिक समाज व ईतर समाजबांधवांनीही व्हावी .संघटने च्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांचे नागपुर शहरात जिवाजी महाले चौक महानगर पालिकेने घोषित करुन त्याच्या पुतळा बांधावा अशी मागणी करण्यात येणार आहे. जीवा महाले हे नाभिक समाजाचे असुनही त्यांनी शिवाजी महाराजां सोबत अनेक लढायात पराक्रम दाखविला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांचे अनन्यसाधारण महत्व होते असे प्रतिपादन विदर्भ वतनचे संपादक श्री गोपाल कडुकर यांनी केले याशिवाय अनेक मान्यवर मंडळीने आपले मत व्यक्त केले त्या मध्ये प्रदेश सचिव प्रविण चौधरी ,नाभिक समाज नेते रमेश (मामा) राऊत , शिवस्मारक समिती महाल व युवा चेतना मंच चे दिलीप डिवटे,दत्ताजी शिर्के यानी जिवाजी महाले याच्या पराक्रमाची माहिती दिली. आभार प्रदर्शन नागपुर जिल्हा अध्यक्ष अमोल ठमके यानी केले . कार्यक्रमाचे संचालन सुरेद्र गणोरकर यानी केले. कार्यक्रमाचे नियोजन विजय खंडे,पिंटु खुर्गे,मंगेश अंबुलकर,अक्षय डेहनकर,गणेश वाटकर, विश्वनाथ सेन , अभिजीत लक्षणे,शेखर कडवे,महेश लांजेवार , अक्षय लक्षंणे यानी केले.