Home अहमदनगर जागतिक मानसिक आरोग्य दिवस

जागतिक मानसिक आरोग्य दिवस

0
जागतिक मानसिक आरोग्य दिवस

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल
श्रीरामपूर (अहमदनगर) जिल्हा प्रतिनिधी-अक्षय तेलोरे : दरवर्षी 10 ऑक्टोबरला जगभरात वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणं हा यामागील दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आजारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आजारांबाबत गांभीर्य निर्माम करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
या वर्षी हा दिवस म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिवस जास्तच महत्वाचा असल्याचे दिसून येते. कारण संपूर्ण जग सध्या कोरोना सारख्या भयंकर महामारीचा सामना करत आहे. या अति वेगाने पसरणा-या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जोपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत सामाजिक अंतर किंवा लॉकडाऊन या सारखे पर्याय अवलंबावे लागत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जग ठप्प असतांना व्यापार उदयोग सर्व व्यवसाय, शाळा, महाविद्यालये, सर्वप्रकारच्या शैक्षणिक संस्था बंद आहेत. एकूणच जीवनावश्यक वस्तू किंवा सेवा वगळता सर्व काही बंद आहे. अशा परिस्थिती अनेक लोकांच्या नोक-या गेल्या अनेकांच्या हाताला काम नाही. उपजीविकेचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत आणि या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) होताना दिसत आहे. कुटुंबाचे प्रश्न, कामाचे प्रश्न, नोक-या, बेरोजगारी, आरोग्य या सारख्या अनेक प्रश्नांमुळे सध्या सर्वत्र नैराश्य आणि वैफल्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य खालावणे साहजिकच आहे.
कोरोना महामारीच्या पूर्वी WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना यांच्या एका सर्व्हे नुसार जगातील दर ४ लोकांपैकी एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणाने मानसिक रुग्ण आहे. हेच प्रमाण कोरोना महामारीच्या काळानंतर नक्कीच वाढू शकते यात मात्र शंका नाही. वाढणारे मानसिक आरयोग्याचे प्रश्न आणि वरचेवर बिघडणारे लोकांचे मानसिक आरोग्य हा खूप चिंतेचा विषय आहे. यश नैराश्य, आरोग्याच्या समस्या आणि खूपच हाताबाहेर गेले तर अगदी मृत्यू देखील होण्याची संभावना असते त्या मुळे या वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिवसाला महत्व आहे.
जगातील मानसिक आजार कमी व्हावा किंबहुना तो नियंत्रणात यावा यासाठी WHO (World Health Organization) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना तसेच वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्था मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. जागतिक पातळीवर समुपदेशन केंद्रे सुरु करून या संस्था लोकांचे मानसिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी लोकांना मदत करत आहेत. आजचा हा दिवस मानसिक रोग्यांना त्यातून बाहेर काढण्याचा व जे लोक त्या दिशेने जात आहेत त्यांना रोखण्याचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here