Home नागपूर आयुध निर्मानी चे कर्मचारी 12 तारखे पासून जाणार बेमुदत संपावर

आयुध निर्मानी चे कर्मचारी 12 तारखे पासून जाणार बेमुदत संपावर

0
आयुध निर्मानी चे कर्मचारी 12 तारखे पासून जाणार बेमुदत संपावर

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल
वाडी अंबाझरी (नागपूर ग्रामिण) प्रतिनिधी अमित हुस्नापुरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन काळाचा गैरफायदा घेत आयुध निर्माणी निगमीकरणाचा घेतलेला निर्णय हा देशहिताच्या व कामगाराच्या विरोधात असून मोदी मुर्दाबाद व निगमीकरण रद्द करा चे नारे लावून संपूर्ण शक्तीनिशी या निर्णयाचा विरोध करून सुद्धा हा निर्णय रद्द न झाल्यास आर्डनंस एम्प्लाॅइज यूनियन (AIDEF) आयुध निर्मानी कर्मचारी यूनियन अंबाझरी (INDWF) लोकशाही कामगार (यु.) संगठन अंबाझरी. (AIBDEF) आणी भारतीय मजदुर संघ या संघटनांनी येणा-या १२ ऑक्टोबर पासून राष्ट्रवादी जनआंदोलन प्रारंभ करण्याची घोषणा संयुक्त कृति समितिच्या माध्यमाने आमच्या प्रतिनीधी जवळ व्यक्त केली.
ही आयुध निर्मानी कंपनी युद्धाच्या वेळी रात्र दिवस करून युद्धा साठी लागणारे साहित्य बनवीत असून या कंपनीला हे सरकार खाजगी क्षेत्राकडे नेण्याच्या दिशेने पाऊल उचलत असल्याने कामगार आक्रमक भूमिका घेत आहे.
या विषयाचे निवेदन जारी करून मोदी सरकारने देशातील 41 आयुध निर्माणीचे निगमीकरण व रक्षा क्षेत्रात 49 टक्के यावरून 74 टक्के एफडीए करण्या-या सरकारवर कडाडून हल्ला केला. या पदाधिका-यांनी सांगितले की, या देशातील आयुध कारखान्यांना पॅकेज देऊन आत्मनिर्भर करण्याऐवजी दूर्बळ करून खाजगी उद्योगाना प्रोत्साहन देत आहे व देशातील लोकांना मोदी हे आत्मनिर्भर बनण्याचे हास्यस्पद आव्हान करीत आहे. डिफेन्स उत्पादनाच्या खासगीकरणाने देश सुरक्षेच्या गुपित बाबी उघड होणे व विकल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी सरकारचा हा निर्णय एकतर्फी व कुणालाही विश्वासात न घेता हिटलरशाहीसमान असून देशाच्या 200 वर्ष परंपरा लाभलेल्या आपल्याच आयुध कर्मचारी व कारखान्यावर अविश्वास दाखविण्याचा आहे. या निर्णयाविरोधात कामगार हितार्थ आधी मोदी सरकारला राष्ट्रीय स्तरावर निवेदन देऊ व जर मागणी मान्य न झाल्यास सोबत राष्ट्रव्यापी कामगार आंदोलन व जनआंदोलन प्रारंभ करेल. मोदी सरकारने लॉकडाऊन काळाचा गैरफायदा घेत कर्मचा-यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा तीव्र आरोप केला. आम्ही या पूर्वी राष्ट्रव्यापी आंदोलन केले. तेव्हा आम्ही असे करण्यापूर्वी विश्वासात घेऊ असे आश्वासन देऊन मोदी सरकार कामगार विरोधी व उद्योगपतींच्या दबावाखाली नियंत्रित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जनतेने सुद्धा देश सुरक्षा खासगीच्या ताब्यात देण्याचा विरोध करावा. असे आवाहन या सर्व उपस्थित पदाधिका-यांनी केले. सरकारने कामगार कायद्यात बदल करून कर्मचा-यांना 8 तासाऐवजी 12 तास काम करण्याचा निर्णय मानवीय तत्वाविरोधात असून, वेठबिगार मजूर अशी अवस्था निर्माण होणार असल्याने 12 ऑक्टोबर पासून अनिश्चित कालीन संपांची भूमिका घेणार असल्याचेही जाहीर केले. या वेळी लाल झेंड्याचे कामरेड मुजुमदार महासचिव विनोद कुमार, जे सी एम मेंबर आशीष पाचघरे, बी एम एस युनियन चे माननीय श्रीराम बाटवे, डाबरे, व्यास ओ. एफ. के. यु. चे महासचिव अरविंद सिंह, प्रवीण महल्ले, लोकशाही कामगार संघटना चे महासचिव वेद प्रकाश सिंह, कार्यसमिति सदस्य सुदर्शन मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here