Home दिन विषेश जागतिक टपाल दिनानिमित्त नागपूर टपाल विभागातर्फे राष्ट्रीय टपाल आठवडा उत्सवाचे आयोजन

जागतिक टपाल दिनानिमित्त नागपूर टपाल विभागातर्फे राष्ट्रीय टपाल आठवडा उत्सवाचे आयोजन

0
जागतिक टपाल दिनानिमित्त नागपूर टपाल विभागातर्फे राष्ट्रीय टपाल आठवडा उत्सवाचे आयोजन

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : पत्र सूचना कार्यालय नागपूर माहिती व प्रसारण मंत्रालय

नागपूर : भारतीय टपाल विभागाच्या पोस्टल जीवन बीमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र यासारख्या योजना सामान्य तसेच खेड्यापाड्यातील नागरिकांसाठी लाभदायक असून त्यांना या योजनाच महत्व कळावं यासाठी 9 ते 15 ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान राष्ट्रीय टपाल आठवडा उत्सवाचं आयोजन नागपूर क्षेत्र टपाल विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली. टपाल आठवड्या उत्सवाच्या निमित्ताने व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आयोजित एका पत्रकार परिषदेदरम्यान ते नागपुरात आज बोलत होते.

आठवडा भर चालणा-या कार्यक्रमांमध्ये जागतिक टपाल दिन, आज बँकिंग दिवस, 12 ऑक्टोबर रोजी डाक विमा योजना, 13 ऑक्टोबर रोजी टपाल तिकिटसंग्रह अर्थात फिलाटेली दिवस, 14 ऑक्टोबर रोजी व्यवसाय विकास दिन तर 15 ऑक्टोबर रोजी मेल्स दिवसचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक टपाल दिनानिमित्त आज सकाळी नागपूर स्थित जनरल पोस्ट ऑफिस, जी.पी.ओ. परिसरात रामचंद्र जायभाये आणि टपाल सेवा नागपुरचे संचालक पवन कुमार डालमिया यांच्याहस्ते कार्यालयीन वाहनांना हिरवी झेंडी दाखवून त्यांना मार्गस्थ करण्यात आलं. ग्रामीण भागातील नागरिकांना पोस्टल सेवांचा लाभ मिळावा यासाठी अस्तित्वात असणा-या सुकन्या समृद्धी योजना, ग्रामीण टपाल विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच बचत आणि आर. डी. खाते याविषयी जायभाये यांनी एका सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. या सर्व योजना ह्या सुरक्षित असून व्याजदर ही चांगले आहेत व त्यांच्यामार्फत बचत होऊन चांगला मोबदलाही मिळतो असे त्यांनी यावेळी नमूद केले.

इंडियन पोस्टल पेमेंट बँक आय.पी.पी.बी. ला सुद्धा प्रतिसाद मिळत असून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 लक्ष 72 हजार 997 आधार संलग्नित पेमेंट सर्विसद्वारे 121 कोटी 64 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून आतापर्यंत आयपीपीबीचे नागपूर विभागात साडे सात लाख बँक खाते उघडले गेले आहेत. पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना सुद्धा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत नागपूर लोकसभा क्षेत्रात पासपोर्ट सेवा केन्द्र कार्यरत झाले आहेत आणि आतापर्यंत या पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून 31 मार्चपर्यंत 54 हजार 904 पारपत्राच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात आली आहे. नागपूर क्षेत्रात 249 आधार अद्यावतीकरण आणि नोंदणी केंद्र असून 30 सप्टेंबर पर्यंत या केंद्रावर 3 लाख 89 हजार 097 व्यवहार करण्यात आले आहेत, अशी माहिती जायभाये यांनी दिली.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आलेल्या पंचतारांकित गावांच्या योजनेबद्दल त्यांनी माहिती सांगितली. या गावांमध्ये बचत खातेए सुकन्या समृद्धी योजना आयपीपीबी खाते टपाल जीवन विमा पॉलिसी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, सुकन्या समृद्‌धी योजना, अशा योजनांचा लाभ ग्रामीण जनतेला दिला जातो आतापर्यंत नागपूर क्षेत्रात सुकन्या योजनेअंतर्गत 28 गावे पूर्ण झाले असून पीएलआय ग्राम म्हणजे संपूर्ण बीमा ग्राम योजनेअंतर्गत 216 गावे विमा ग्राम म्हणून समाविष्ट झालेली आहेत.

या पत्रकार परिषदेला पत्र सूचना कार्यालय नागपूर चे सहायक संचालक शशीन राय, डाक सेवा नागपूरचे संचालक पवन कुमार डालमिया उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here