Home इतर शासकिय अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे: तालुका काँग्रेस...

शासकिय अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे: तालुका काँग्रेस कमेटीची मागणी

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5307 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

187 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : आमगाव तालुका गोंदिया- राहुल चुटे
आमगावः . तालुका काँग्रेस कमिटी आमगाव च्या वतीने श्री संजयभाऊ बहेकार तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन व वृद्ध शेतकरी अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी महोदय यांना मा. तहसीलदार आमगाव यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजना, वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसाह्य योजना या योजनेतील अनुदान मागील गेल्या चार ते पाच महिन्यांपासून न मिळाल्याने लाभार्थ्यांच्या समोर आपली उपजीविका चालविण्यासाठी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्याच्या स्थितीत कोरोनाच्या प्रादूर्भावमध्ये संजय गांधी निराधार वर्गातील विधवा लाभार्थी बाहेरील रोजगारापासून सुद्धा वंचित आहेत. अपंग, अंध व्यक्तींचे बेहाल होत आहे. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थी हे वृद्ध असल्याने त्यांच्यासमोर आपल्या आरोग्य बाबतच्या उपचार व औषधीसाठी पैसा नसल्याने त्यांचेसुद्धा हाल होत आहेत. या वर्गातील घटकांची समस्या लक्षात घेता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी महोदय यांना शासनस्तरावर लवकरात लवकर अनुदान प्राप्त करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मा. श्रीमती छबुताई उके अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, अजय जी खेतान शहराध्यक्ष, मा. जगदीश जी चुटे पक्ष संघटक, मा. रामेश्वरजी श्यामकुवर संघटक प्रमुख, मा. महेश जी उके संघटक प्रमुख मा. किशोर जी बिसेन मा. बाबूलाल जी बघेल. मा. श्रीमती अनिता बाई मेंढे, मा. महेंद्रजी पटले, मा राहुलजी ब्राह्मणकर, मा. निलेश जी तरोने, मा. समीर रहांगडाले, मा. श्रीमती छाया मेश्राम, मा. श्रीमती ममता मच्छरके, मा. अनिल ब्राह्मणकर, मा. प्रकाश चौधरी, मा. छानुबाई बोपचे, मा. अंतिका अग्रवाल, मा. लक्ष्मीबाई मेंढे, मा. श्रीमती सरस्वता शिवणकर व इतर सन्मानित कांग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.