Home इतर खासदार प्रफुल पटेल व आमदार अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर ओबीसीं थाळीनाद आंदोलन

खासदार प्रफुल पटेल व आमदार अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर ओबीसीं थाळीनाद आंदोलन

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5303 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

198 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल: गोंदिया जिल्हा प्रतिनिधी- राधाकिसन चुटे
गोंदिया: ओबीसी संघटनांच्यावतीने आज 8 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत गोंदिया येथे ओबीसी संघर्ष कृती समिती. ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यसभा खासदार प्रफुल पटेल व गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद करुन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बहुजन मंत्री आदींच्या नावे असलेले निवेदन गोंदिया उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फेत पाठविण्यात आले. या आंदोलनात ओबीसी संघर्ष कृती समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी सेवा संघ, भारतीय शोषित पिछडा संघ, बहुजन युवा मंच, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ आदी संघटना सरभागी झाल्या होत्या.