राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती निमित्ताने कोरोनावर मात करण्यासाठी जनजागृती

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5300 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

297

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर जिल्हा ग्रामिण प्रतिनिधी – नान्हा-मांगली मंडई मंडल मु. नान्हा, त. कामठी, जि. नागपूर: नान्हा मांगली येथे 2 आॅक्टोंबर 2020 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती निमित्ताने कोरोना व्हायरस वर मात करण्यासाठी गावक-यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. कोरोना-19 या रोगामुळे गावक-यात व समाजात आरोग्याविषयीे फार भयभितता निर्माण झालेली आहे. लोकातील कोरोना विषयीचे भय गावक-यांच्या मनातून काढण्यासाठी तसेच कोरोना या रोगावर कशाप्रकारे गावक-यांना स्वतःचे संरक्षण करता येईल या करीता शाहीर श्री ईश्वरभाऊ रायभान व श्री सुरेश दिलीप बापुराव करडभाजने यांनी पोवाडा तयार करून “मास्क लावा तोंडावरी घरात असो वा बाहेर अंतर ठेवा दुरवरी”, ”सर्दी ताप येताच तपासुन घ्यावे डाॅक्टरांच्या हाते गोळया खाल्या तर रोग जाते दुरवरी” ”स्वच्छता ठेवा आपल्या घरोघरी तेव्हा कोरोना होईल नष्ट” असे गावक-यांमध्ये व गावामध्ये अंतर ठेवून पोवाडा गाण्यात आला त्यामुळे गावातील लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे.
या पोवाडयाच्या कार्यक्रमाला सहकार्य श्री संजय अंबाडकर, श्री सुर्यकांत चैधरी श्री गजानन करडभाजने, श्री दयारामजी झंझाड, श्री ईश्वरजी अतकरे व गावातील सर्व मान्यवरांनी सहकार्य केले