Home नागपूर उमेदच्या 10 लाख महिला सोमवारी रस्त्यावर उतरणार: मुकमोर्चातून सरकारचा निषेध नोंदविणार

उमेदच्या 10 लाख महिला सोमवारी रस्त्यावर उतरणार: मुकमोर्चातून सरकारचा निषेध नोंदविणार

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5298 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

295 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल – प्रतिनिधी नागपूर: महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान आता बाहय संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून संस्था मोडकळी स येण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू रहावे व बाहय संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी राज्यातील 10 लाख महिलांनी एल्गार पुकारला आहे. दिनांक 12 आॅक्टोंबर ला राज्यातील 10 लाख महिला मुकमार्चा काढुन शासनास जाब विचारणार आहेत.
उमेद अभियानाचे जवळपास पाच लक्ष बचत गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ, राज्यभर उभे झाले आहेत यात 50 लाख पेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या आहेत या महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि त्यातून त्यांना शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी अभियानाने समर्पित कर्मचारी व अधिकारी भरती केली आहे. समुदाय संसाधन व्यक्ती, बॅंक सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषी सखी, पशु सखी, ग्रामसंघ लिपिका, कृती संगम सखी यासारखे अनेक कंडर ग्रामीण कुटूंबाचे शाश्वत उपजिविकेसाठी विविध उपक्रमाचे माध्यमातून कार्यरत आहेत. शिवाय 3 हजार समर्पित कर्मचारी या महिलांसाठी अहोरात्र झटत आहेत. ज्या कर्मचा-यांचे वार्षिक नुतनीकरण करार संपले अशा चारशे पन्नास कर्मचारी यांना गेल्या महिनाभरात ताटकळत ठेवले, करार नूतनीकरण होईल तुम्ही काम करत रहा असे सांगितले. नुकतेच आता एक परिपत्रक काढून कार्यमुक्त करण्याच्या सूचना देऊन सर्वांचे काम थाबंविले. सोबतच पुढील करार पत्र राज्याला पाठवू नये अशा देखिल सूचना देऊन सर्वांना घरचा रस्ता दाखविला. कोविड-19 च्या नावाखाली हा प्रकार खपविला जात असला तरी या सर्व बाबीला सत्ताधारी व सनदी अधिका-यांच्या अर्थ संबंधाची किनार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता महिलांनी अभियानाला वाचविण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. यासाठी 12 आॅक्टोंबर ला राज्यभर मुकमोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले जाणार आहे. व या संदर्भात सर्व जिल्हा प्रशासनास महिलांनी निवेदन सादर केले आहे. या अभियानाला वाचविण्यासाठी महिला रस्त्यावर उतरत असल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे या आदोलनाने सरकारला जाग आली नाही तर राज्यभर पुढील काही दिवसात महिला स्वतःच्या हक्कासाठी आत्मदहन आंदोलन करतील त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही महिलांनी केली आहे. कोणतेही राजकीय पाठबळ न घेता स्वतः महिला रस्त्यावर उतरत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.