
विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल – (माहिती आणि प्रसारण मंत्रालय) : मास्कचा वापर करा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टेसिंग चे पालन करा दो गज की दुरी चे पालन करा असे पंतप्रधानांनी देशाला कोविड.19 संदर्भात योग्य आचरण ठेवण्याचे स्मरण करून दिले आहे
कोरोनाविरोधात एकत्रित लढा देण्यासाठी लोक.चळवळीचा प्रारंभ करताना त्यांनी जनतेला याची आठवण करून दिली आहे. जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी आणि कोविड.19 विरोधातला लढा एकत्रितपणे जिंकण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशव्यापी चळवळीचा भाग म्हणून केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश, मंत्री, विभाग आणि राज्य सरकारांसमवेत नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. प्रदेशनिहाय संपर्कासह विशेषतः कोविड.19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत अशा जिल्ह्यात तिथल्या गरजांनुसार आखलेल्या विशिष्ट संपर्क अभियानांतर्गत नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. आवश्यक ते खबरदारीचे उपाय योग्य अश्या माध्यम, मंचाद्वारे पोहोचवण्यात येतील. प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ होईल अशा सोप्या आणि सुलभ संदेशावर विशेष लक्ष पुरवण्यात येईल असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या मोहिमे संदर्भात बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग या मोहिमेमध्ये सक्रियपणे सहभागी झाले आणि संक्रमणाविरोधात एकत्र येण्याचा संकल्प केला. कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याची आणि इतरांनाही प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा घेतली. जीएसटी आयुक्तालय, प्राप्तीकर विभाग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, पत्र सूचना कार्यालय, प्रकाशन विभाग, फिल्मस डिव्हीजन, आकाशवाणी, दूरदर्शन, बृहन्मुंबई महानगरपालिका हे विभाग यात सहभागी झाले होते. तसेच बीपीसीएल, ओएनजीसी, एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग समूह यांनीही या अभियानात सहभाग नोंदवला. शासकीय कार्यालयांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी जनतेला कोविड.19 उचित व्यवहारासंबंधी मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत.
हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो. आर.ओ.बी., महाराष्ट्र आणि गोवा विभागाने जन जन की बातें हे ब्राॅडकाॅस्ट सुरु केले आहे. तसेच आरओबीने कोरोना जनजागृतीसाठी काही जिंगल्स तयार केल्या आहेत. या अभियानाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करताना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई म्हणाले की, लोकांमध्ये वर्तणुकीतील बदल घडवून आणण्यासाठी जनसंवाद अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
सार्वजनिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी या राष्ट्रीय अभियानाला आपला पाठिंबा दर्शवला असून लोकांना खेद करण्याऐवजी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर सुरक्षित आणि अधिक जबाबदार सार्वजनिक वर्तन करण्यास हातभार लावेल जेणेकरुन या महामारीविरुद्ध लढा देण्यास आपण अधिक सक्षम होऊ.

