
विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : श्रीरामपूर प्रतिनिधी प्रा: अक्षय तेलोरे – श्रीरामपूर – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने गेले वर्षभरापासून जगभर सर्वत्र थैमान घातलेल्या कोविड-१९ अर्थात कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात रवास करून श्रीरामपूर शहरात व तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, आरोग्य सेवक व त्यासंबधीत निगडीत असलेल्या सर्वांचा ” वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स ” अवॉर्ड देऊन यथोचित गौरव केला.
डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी हे देखील माणसंच आहेत. संपूर्ण जग लॉक डाऊन असताना समाजसेवेचा खरा वसा घेतलेले डॉक्टर्स व त्यांचे सहकारी अहोरात्र रुग्णांची सेवा करत होते. एक प्रकारे ते देवदूत म्हणूनच समाजात वावरत होते. अशा डॉक्टर्स व त्यांच्या कर्मचारी सहकाऱ्यांना सन्मानित करून वर्ल्ड पार्लमेंटने त्यांच्या कार्याला एक प्रकारे सलामच केला आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स आजही समाजात मानाचं स्थान टिकवून आहेत. त्याच अनुषंगाने डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र (चॅप्टर ) श्रीरामपूर ने शहरातील डॉ.आशिष सोमाणी ( ऑर्थोथो तज्ञ ), डॉ. अर्चना सोमाणी, नेत्ररोगतज्ञ डॉ. बाळासाहेब बारहाते, स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रमोद राजाराम गाडे, डॉ.पूनम गाडे, प्रजासत्ताक हॉस्पिटलचे डॉ. पुंजा देवराम मोरे, डॉ. विजय हरिभाऊ गायकवाड, डॉ. सुभाष बबनराव येलम(साबदे), श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मुकुंदराव शिंदे, तसेच श्रीरामपूरात विशेष कोविड सेंटर चालवून रुग्णांना उत्कृष्ठ सेवा देणारे डॉ. विनायक मोरगे व रमेश रामभाऊ गायकवाड ( प्राथमिक शिक्षक ), स्वतःची पदरमोड करून समाजकार्य करणारे प्रविण रावसाहेब गायकवाड व वरील डॉक्टर्स मंडळींच्या हॉस्पिटलमध्ये सेवेत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा ” वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स ” हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन शासकीय व आरोग्य खात्याच्या नियमांचे पालन करत डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर चॅप्टरचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रसिद्धी समन्वयक डॉ. दत्ता विघावे, सचिव भाऊराव माळी, जेष्ठ सदस्य भिमराज बागुल ( आरोग्य सेवक ), स्थानिक सल्लागार समिती सदस्य अनिलराव पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरसे यांनी वरील डॉक्टर्स व आरोग्य सेवकांना सन्मानित केले.

