विदर्भ वतन श्रीरामपुर, अहमदनगरचे प्रतिनिधी प्रा. अक्षय तेलोरे हे वल्र्ड पार्लमेंट कोरोना वाॅरीयरर्स पुरस्काराने सन्मानित

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5284 ☝️ *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

358

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल नागपूर: श्रीरामपूर येथील विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल चे प्रतिनिधी प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे यांना वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यात तसेच देशात कोरोना महामारी आजाराने थैमान घातले असून संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे.  या काळात प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे यांनी आपल्या दर्जेदार लेखणीने शिक्षण, सामाजिक व इतर अनेक विषयांवर विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून लिखाण करून ज्ञानदान तसेच प्रबोधनाचे काम केले आहे.  तसेच सर्व शासकीय नियमांचे पालन करून त्यांची अंमलबजावणी केली आहे. याचीच दखल घेत वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन,  डब्ल्यूसीपीए म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र चॅप्टर चे अध्यक्ष डॉ दत्ता विघावे व त्यांच्या निवड समितीने प्रा. अक्षय तेलोरे यांची निवड करून त्यांना वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या त्यांच्या भरीव कामगीरीबद्दल विदर्भ वतन वृत्तपत्र संपादकिय विभाग, न्युज पोर्टलचे महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधी व विदर्भ वतन संपुर्ण टीम तर्फे प्रा. अक्षय तेल्होरे, श्रीरामपुर, अहमदनगर प्रतिनिधी (विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल) यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या कार्याचे सर्व स्तरावर कौतूक करण्यात येत आहे.