धनगर समाज सेवा संस्थेकडून दहिवडी येथे तहसिलदार यांना निवेदन, धनगर आरक्षण प्रश्‍न सोडवण्याची मागणी

209

सातारा जिल्हा प्रतिनिधी
विशाल गुरव
दहिवडी- धनगर आरक्षण प्रश्‍न तातडीने सोडवावा या मागणीसाठी धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी धनगर समाज सेवा संस्था तालुकाध्यक्ष दत्तात्रेय दडस, उपाध्यक्ष चंद्रशेखर काळे, मल्हारी काळे, अण्णाभाऊ काळे, सागर शेंबडे, प्रवीण बनसोडे, अशोक खरात, शंकर खरात आदी उपस्थित होते. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाच्या राजकीय,आर्थिक सामाजिक, शैक्षणिक स्थिती हलाखीची व बिकट झाले आहे. यामधून धनगर समाजाची उन्नती होण्यासाठी यापूर्वी महाराष्ट्राचे यादीत धनगर समाजाचा आदिवासीत समावेश आहे. तथापि, धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्याने समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाहीत. ही दुरुस्ती होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आदिवासींच्या यादीत अनुक्रमांक 36 वर धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करण्याबाबतची शिफारस करावी. केंद्र शासनाने याबाबत चे बिल तयार करून संसदेत सादर करावे किंवा संसदेत सादर झालेल्या 325 अनुक्रमांकाच्या बिलामध्ये दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे किंवा या दुरुस्ती बाबतचा राष्ट्रपतीच्या मान्यतेने आदेश त्वरित करण्यात यावा. अशी विनंती धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली.
निवेदन तहसीलदारांनी त्यांच्या शिफारशीसह मुख्यमंत्र्यांना सादर करावे, अशी विनंती धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात आली.