Home ग्रामिण वाडी येथे भारतीय काॅंग्रेस व महिला काॅंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

वाडी येथे भारतीय काॅंग्रेस व महिला काॅंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

0
वाडी येथे भारतीय काॅंग्रेस व महिला काॅंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल वाडी तालुका प्रतिनिधी: अमित हुस्नापुरे

वाडी (जिल्हा नागपूर) : तालुका केंद्र सरकारला शेतकरी विरोधी विधेयक व कामगार विरोधी विधेयकांच्या विरोधाला भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस नागपूर तालुका हिंगणा युवक काॅंग्रेस तसेच वाडी शहर महिला काॅंग्रेस च्या वतीने दिनांक 2 आॅक्टोंबर 2020 रोजी महात्मा गांधीजी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच उत्तरप्रदेश मध्ये हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत व तिची हत्या करून रातोरात तिला जाळण्याच्या निषेधार्थ मा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या उत्तरप्रदेशच्या हाथरस दौ-यादरम्यान त्यांना पोलिस प्रशासनाच्या सहाय्याने धक्काबुक्की करून अटक केल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन वाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ, खडगाव रोड, वाडी येथे करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव मा. नानाभाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. कुंदा राऊत भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकारणी सदस्या, नागपूर तालुका ग्रामिण काॅग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश कोकाटे नागपूर जिल्हा परीषदच्या शिक्षण व वित्त विभागाच्या सभापती मा. भारतीताई पाटील, जिल्हयाचे उपाघ्यक्ष मा. भिमरावजी कडु, सचिव दुर्योधनजी ढोणे, पंचायत समिती नागपूरच्या सभापती रेखाताई वरठी, जि.प. सदस्या ममताताई धोपटे, ज्योतीताई राऊत, पं. स. सदस्या सौ. प्रितीताई अखंड, सौ. शालीनी मनोहर, अनिल पाटील, वाडीशहर अध्यक्ष शैलेष भोसले, हिंगणा विधानसभा अध्यक्ष अश्विन बैस, राजेश थोराणे, प्रशांत कोरपे, संजय जिवनकर, निशांत भरवत,, मा. भिमरावजी लोखंडे, बेबीताई ढबाले, प्रमिलाताई पवार, महेश चोखांद्रे, पांडुरंग बोरकर, गौतम तिरपुडे, भिमराव कांबळे, गोपाल वरठी इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here