Home महाराष्ट्र विनोदी कलाकार भारती सिंग व संबंधित कलाकारांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा :...

विनोदी कलाकार भारती सिंग व संबंधित कलाकारांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा : आदिवासी समाज शेतकरी आघाडी यांची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5248 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

225 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल पालघर : विनोदी कलाकार भारती सिंग व संबंधित कलाकारांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करा
नागपूर: आदीवासी समाज शेतकरी आघाडी यांच्या तर्फे नुकतेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, आदिवासी मंत्री, प्रसारणमंत्री व पोलीस अधीक्षक साहेब पालघर आणि निरीक्षक कासा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे. 26 सप्टेंबर रोजी कलर्स टीव्ही मालिका द्वारे भारती सिंग हिने विनोद करण्याबद्दल आदिवासी समाजाचे लज्जास्पद वर्तन केले असता संपूर्ण आदिवासी समाजाच्या अस्मितेचा अपमान व अनादर करून आदिवासी समाजाच्या भावना दुखवून चॅनेलचे माध्यमातून प्रसारित करून अपमान केला आहे. त्यामुळे भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी व शेतमजूर संघटनेचे संस्थापक संतोषराव मेश्राम व राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष द्रौपदी जगने, रजनीताई आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक अध्यक्ष अजय गवई यांच्या द्वारा आदिवासी समाज शेतकरी समाजाची मागणी आहे की कलर्स एचडी चॅनेल त्वरित बंद करण्यात यावे व भारती सिंग व तसेच कार्यक्रम निर्माता व इतर कलाकारांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आदिवासी समाजाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अन्यथा आदिवासी समाज शेतकरी आघाडी वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अनेक राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आदिवासी समाज शेतकरी आघाडी अजय सखाराम तुंबडा महाराष्ट्र प्रदेश महासचिव चिंतामण सावर, कमलेश भुसारा, दशरथ दळवी, संतोष भुसारा, विलास मेघवाले यावेळी उपस्थित होते. यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून असा इशारा आदिवासी समाजाने दिलेला आहे.