विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल  नागपूर : दि 1 ऑक्टोबर 2020 आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी.आय.टी.यू.च्या प्रतिनिधी मंडळ यांना सहा. अप्पर आयुक्त महानगर पालिका राम जोशी यांच्यातर्फे 28 तारखेला साडे तीन वाजता बोलावण्यात आले. 3ः15 मिनिटापासून सहा वाजून पंधरा मिनिटे पर्यंत 6 प्रतिनिधी त्यांच्या दालना समोर थांबून त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सुद्धा बोलावण्यात आले नाही. परत आज 30 तारखेला साडे तीन वाजता बोलावण्यात आले. सव्वातीन वाजता पासून युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे कॉम. दिलीप देशपांडे, महासचिव प्रीती मेश्राम, सचिव रंजना पौनिकर, कांचन बोरकर, पिंकी सवाईथूल, रुपलता बोंबले, साडेचार वाजेपर्यंत त्यांच्या केबिन समोर थांबून सुद्धा बोलावण्यात आले नाही. त्यामुळे सर्व प्रतिनिधी तिथून निघून गेले आणि हा निर्णय घेतला की आता महानगर पालिकेने निर्णय घ्यावा पुढे आम्ही भेटायला जाणार नाही. येत्या 5 ऑक्टोबर पासून बेमुदत संप करणार आणि महानगर पालिकेच्या विरुद्ध आणि आतापर्यंत न बोलावणा-या व निर्णय न घेणा-या जिल्हापरिषदे विरुद्ध संविधान चौका मध्ये 5 ऑक्टोंबर रोजी 11 वाजता पासून आंदोलन करणार
मागण्या
१. आशा वर्कर्स व गट प्रवर्तक यांना कोरोना कामाचे ३०० रू रोज दया.
२. कोरोना सर्वे करतांना मुबलक सुरक्षा साहित्य द्या
३. कोरोना बाधीत झालेल्या आशा किंवा गट प्रवर्तक यांची मानधन कपात थांबवा
४. आशा व गटप्रवर्तक यांची प्रताडना थांबवा
५. सर्वे करतांना आशा सोबत आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवक देण्यात यावे. सर्व आशा वर्कर्स व गट प्रवर्तक नागपूर जिल्ह्यात ५ तारखेपासून कोरोना काम बंद ठेऊन ग्रामीण व शहरी आशा वर्कर्स व गट प्रवर्तक या संविधान चौकात आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवणार असे अध्यक्ष राजेंद्र साठे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर प्रसिद्धी पत्रकात इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed