देवरी तालुक्यात जन्मदात्या वडिलानेच केली पोटच्या मुलाची हत्या 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5239 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

212

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल गोंदिया जिल्हा प्रतिनिधी : राधाकिसन चुटे गोंदिया: गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणा-या शिलापूर गावात एका जन्मदात्या वडिलानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याने शिलापूर गावात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी वडील सखाराम वघारे याला अटक केली आहे  ३६ वर्षीय मृतक माखन वघारे याला दोन पत्नी असून मृतकाच्या दोन्ही पत्नी गावात वेगवेळ्या ठिकाणी राहत असून दुस-या पत्नीला घरी आणण्याचा आग्रह मृतक माखन हा आपल्या वडिलांकडे करत असून याच कारणा वरून दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे मात्र काल संध्याकाळी देखील माखन ने आपली वडिलांशी याच विषयावर भांडण केले असून भांडण इतके विकोपाला गेले कि सखाराम यांनी कु-हाडीच्या दंडाने माखनच्या डोक्यावर वार केले असून माखन चा घटना स्थळीच मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना होताच पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदना करिता पाठविले आहे. तर देवरी तालुक्यात दोन दिवसा आधी देखील मोठ्या भावाने जमिनीच्या वादातून लहान भावाची हत्या करीत जंगलात मृतदेह नेऊन फेकला होता. त्यामुळे देवरी तालुक्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का असा प्रश्न निर्माण होतो.