Home गोंदिया गोंदिया जिल्हयातील आमगाव येथील नवतलावात 33 वर्षीय युवकाचा मृत्यूदेह

गोंदिया जिल्हयातील आमगाव येथील नवतलावात 33 वर्षीय युवकाचा मृत्यूदेह

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5236 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

116 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल. आमगाव तालुका (गोंदिया जिल्हा) प्रतिनिधी: राहुल चुटे
आमगाव:. आज सकाळी 33 वर्षीय युवकाच्या मृतदेह आमगाव येथील नवतलावात पाण्यात तरंगतांनी आढळला आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा कुंभारटोली परिसरात असलेल्या नवतलावात आज सकाळी कुंभारटोली येथील 33 वर्षीय सत्यकुमार बाबुराव सोनवणे याच्या मृत्यूदेह तरंगतांना तलावात आंघोळ करणा-याना दिसला याची माहिती त्यांनी परिसरातील लोकांना दिली तेव्हा परिसरातील लोक त्या मृतदेहाला पाहायला आले असता तो मृतदेह सत्यकुमार सोनवणे चा असल्याची ओळख पटली सत्यमकुमार हा काल दुपारपासून घरून निघून गेला होता त्यांच्या घरच्या लोकांनी परिसरात शोधा शोध केली परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही पण आज सकाळी नवतलावात आंघोळ करण्याकरीता आलेल्या व्यक्तींनी ही माहिती परिसरातील लोकांना दिली व तिथे मृतकाचे वडील व भाऊ पाहायला आले असता तो मृतदेह सत्यकुमार सोनवणेचाच असल्याचे आढळून आले या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळ गाठून त्याचा मृत्यूदेह तलावातुन काढून त्याचा पंचनामा करण्यात आला व मृतदेहाला ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार दिलीप कन्नमवार करीत आहे.