गावात दारूबंदी करा अन्यथा साखळी उपोषण -सुमारे १५०० महिलांनी दिला इशारा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5232 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

298

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल गोंदिया जिल्हा प्रतिनिधी – राधाकिसन चुटे

गोंदिया: देवरी तालुक्यातील चिचगड परीसरातील १८ गावात दारूबंदी केली नाही तर देवरी शहरातील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा सुमारे १५०० महिलांनी इशारा प्रशासन शासन व जनप्रतिनीधीनां दिला आहे. देवरी तालुक्याच्या चिचगड व त्या परीसरातील गावातील महिलांनी दारूबंदीसाठी स्थानीक पोलीस स्टेशनए उपविभागीय अधिकारीए तहसील कार्यालय स्थानीक जनप्रतिनीधी, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे अनेक महीण्यापासुन लेखी निवेदन दिले असले तरी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने चिचगड सह परीसरातील ग्रामीण भागातील तात्काळ दारूबंदी झाली नाही तर देवरी येथील उपविभागीय कार्यालया समोर साखळी उपोषण करू असा इशारा १५०० महिलांनी दिला आहे.
देवरी तालुक्यातील चिचगड क्षेत्रातील व स्थानीक चिचगड येथील सुमारे १५०० महीलानीं गावाच्या आत असलेल्या दारु विक्रीमुळे घरातील पुरुषावर व मुलानंर होणारे परिणाम सांगत तालुक्यातील चिचगड व ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक महीण्यापासून सुरु असलेल्या दारु विक्रीमुळे होणा-या परिणामाला कंटाळुन चिचगड गावातील महीलानी शासन, प्रशासन, जनप्रतिनीधी यानां वेळोवेळी निवेदने दिले होते. मात्र या गावात दारूबंदी होत नसून या दारूमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पुरूष मंडळी हे दारू पिऊन स्वतःच्या घरामध्ये अश्लील शिवीगाळ करत असतात त्याच बरोबर महिलानां मारपीट करण्याचा प्रकार होत असतो यामुळे नेहमी गावातील घरात वादविवाद होत असूनए पुरूष दारू पिऊन महिलांना मारहाण करीत असून गावातील अनेक संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहे. त्यामुळे गावात दारूबंदी व्हावी यासाठी चिचगड येथील महिला अनेक कार्यालयाचें व जनप्रतिनीधींचे दरवाजे खटकीवीले पण त्या हजारो महीलांची दखल कुणी अजुन पर्यंत घेतली नसल्याने महीलानीं देवरी येथील उपविभागीय कार्यालया समोर उपोषन करण्याचा इशारा शासन, प्रशासन व जन प्रतिनीधीनां दिला आहे. या संदर्भात चिचगड येथील सरपंच यांच्याशी दारुबंदी संदर्भात आमच्या प्रतिनीधीने चर्चा केली असता दारुबंदी संदर्भात कोणतीही लेखी तक्रार महीलांची नसल्याची सरपंचांनीं सांगीतले आहे.