Home कृषिसंपदा गोंदियात कृषी विधयेक बिलला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा 

गोंदियात कृषी विधयेक बिलला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा 

0
गोंदियात कृषी विधयेक बिलला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा 

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल गोंदिया जिल्हा प्रतिनिधी – राधाकिसन चुटे
गोंदिया :- केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजुर करून घेतली असुन या नविन काळ्या कायद्यामुळे शेतातील शेती आणि शेतकरी पुर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. या विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेत मजुर रस्त्यावर येउन या विधयेकाला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांच्या आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे. या सरकारचा पुर्वानुभव पाहता ते संसदेसह कोणाशीही चर्चा या संवाद न साधताच गरीब शेतक-यांवर हा कायदा लावत आहे. या कायद्यामुळे लॉकडाउनच्या परिस्थितीत सुध्दा देशात शेती उद्योग हा एकमेव उद्योग सध्या सुरू आहे. या उद्योगाला सुध्दा बड्या उद्योगपतींच्या घश्यात घालण्याचा प्रयत्न होत आहे. ही शेतकरी विरोधी विधेयके मागे घेण्यात यावे, या मागण्या घेऊन आज काँग्रेस द्वारे काँग्रेस भोला भवन येथून शेकडोच्या संख्येत काँग्रेस कार्यकतें यांनी  बैलबंडी घेऊन शहरातील मुख्य चौकात-चौकाततून शहरातील बाजार परिसरातून या विधयेका विरोधात मोर्चा काढत  व  उपविभागीय अधिका-यांना निवदेन देण्यात आले. राष्ट्रपतींनी हा विधेयक मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here