शब्दालंकार साहित्य मंडळ आयोजित ऑनलाइन गीत गायन स्पर्धेचा निकाल जाहीर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5221 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

291

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

मुंबई प्रतिनिधी शब्दालंकार साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन गीत गायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत जवळपास 60 कवींनी आपले गीत सादर केले. ह्या स्पर्धेला गायकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला हे सांगतांना मला अतिशय आनंद होतोय. र्लाकडाउन मधील गणरायाचे आगमन अधिक आनंददायी व्हावे ह्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे शब्दालंकार मंडळाच्या अध्यक्षा नेहा धारूळकर व उपाध्यक्षा समाजसेविका सौ. संगीता पाध्ये यांनी सांगितले. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. बालगट, किशोर गट आणि खुला गट.
बाल गट – प्रथम क्रमांक – ज्ञानदा शिंदे, द्वितीय क्रमांक – केया घरत, तृतीय क्रमांक – अमृता देशपांडे
किशोर गट: सर्वोत्कृष्ट – युक्ता शेलार, उत्कृष्ट – साक्षी ठीक, प्रथम – धनश्री महाजन, द्वितीय – दिपक नाचरे, तृतीय – आर्यन जाधव, उतेजनार्थ – सायली राऊत, वेदांत जाधव यांना विभागून देण्यात आले.
खुला गट: सर्वोत्कृष्ट – अनंत शेणॉय, उत्कृष्ट – ऋतिका भोईर व सुनिल पवार यांना विभागून देण्यात आले. प्रथम – अशोक सारंग, भारती रॉय, आकाश सावंत यांना विभागून देण्यात आले.
द्वितीय – प्रिया पालकर, जयश्री मगर, पल्लवी गवळी, प्राची पाटील यांना विभागून देण्यात आले.
तृतीय – भारती कुंभार, प्रिती अपराज, प्रणाली म्हात्रे, स्मिता अय्यर यांना विभागून देण्यात आले.
उत्तेजनार्थ – दीपा वणकुद्रे, वृंदा सारंग, शलाका गाडगीळ, निलजा देशपांडे, रोहित तुपट, रमेश गोसावी, सुरेखा यादव, मंजुषा गवई, अमोल खटावकर, स्मिता भातगावकर विभागून देण्यात आले. असे हे ह्या निकालाचे स्वरूप होते. बाल गटाचे व किशोर गटाचे परीक्षण समाजसेविका सौ. संगीता पाध्ये ह्यांनी तर खुल्या गटाचे परीक्षण मा. श्री दिपक पांडे सर व सौ. शैलजा कानडे ह्यांनी उत्तम प्रकारे केले. त्यांना सन्मानपूर्वक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.