निढळ येथे सेवागिरी कोरोना केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5218 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

202

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी ः विशाल गुरव
COVID : 19 वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आज निढळ तालुका खटाव येथे सेवागिरी कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे, सातारा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम, प्रदीप विधाते, डॉ. अंबादास कदम, डॉ. अमित पाटील यांच्या उपस्थितीत निढळ येथील संस्कृतीत हॉलमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी माण. खटाव मध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता निढळ येथे उभारण्यात आलेल्या सेवागिरी कोरोना केअर हॉस्पिटल चे कौतुक केले. तसेच मान खटाव मध्ये अजून सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन कोरोना हॉस्पिटलसाठी मदत केली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.