माणमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेची आकडेवारी कागदावरच : संजय भोसले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5208 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

230

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी : विशाल गुरव

दहिवडी : माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या जनतेचे आरोग्य चे हित लक्षात घेता आखलेली योजना आहे. या योजनेचे व्यापक हित लक्षात घेता सामान्य लोकांचे महिन्यातून एकदा नव्हे तर दोनदा त्यांच्या दारापर्यंत येऊन शासनाचे प्रतिनिधी कोरोना आजाराची माहिती, त्याची ऑक्सीमीटर तपासणी, तापमान घेऊन गावातील कोरोना स्थितीची तंतोतंत माहिती घेणार आहेत. याच्यातून सोम्य लक्षणे, अधिक लागण झालेल्या टेस्ट आणि त्याला लगेच उपचार मिळून नागरिकांचा जीव वाचविण्यास आणि संसर्ग टाळण्यास देखील मदत मिळणार आहे.
जनहिताची ही योजना अनेक तालुक्यातील कामकाज पाहता माणमध्ये या योजनेबाबत फक्त बैठक घेऊन गेली दहा-पंधरा दिवस अधिकारी गप्प का आहेत ? मिळालेल्या माहितीनुसार माण तालुक्यातून जिल्हा यंत्रणेला फक्त कागदपत्रे आकडेवारी पाठविण्यात आल्या आहे. हे सरळ सरळ जनतेची फसवणूक आहे. आरोग्य खात्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे कारण पुढे करत अजून अनेक भागात सुर्वे सुरू झाला नसल्याची माहिती दिले आहे.मग असा प्रश्न पडतो की तालुक्यातून जिल्हा यंत्रणेला दिलेली माहिती खरी की खोटी ? अशाप्रकारे कोरूनाच्या महामारीत देखील शासनाच्या योजनेच्या बट्ट्याबोळ करणारे व जनतेच्या जिवाशी खेळणारे अधिकारी यांच्यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही, असा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केला.