कामठी येथे झालेल्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या हत्येचा योग्य तपास व्हावा: सकल नाभिक समाजाचे टेंभुर्णी पोलिस स्टेशनला निवेदन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5203 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

188

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल सावनेर तालुका प्रतिनिधी- श्री सुरेश इंगळे
कामठी : कामठी नागपूर येथे झालेल्या नाभिक समाजातील व्यक्तीच्या हत्येचा योग्य तपास व्हावा यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

कामठी जिल्हा नागपूर येथे क्षुल्लक कारणावरून सलून व्यावसायिकाचा लाकडी दांडक्याने डोक्यामध्ये वार करून खून करण्यात आला होता. या हत्येचा निषेध करण्यासाठी व हत्येतील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यासाठी सकल नाभिक समाज टेंभुर्णी शहर च्या वतीने टेंभुर्णी शहर पोलीस स्टेशन येथे शितोळे साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय भाऊ कोकाटे, संत सेना महाराज नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष योगेश नाना साळुंखे, सौदागर मामा साळुंखे भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धीप्रमुख सुरज देशमुख, तानाजी जाधव, विकास चौधरी, भाऊसाहेब थोरात, भैय्या काशीद, गणेश राऊत, दादासाहेब चौधरी, बाळासाहेब साळुंखे, सचिन गाडेकर, सचिन चौधरी, गणेश चौधरी, अजय कोकाटे, लखन माने, महेश चौधरी, आकाश राऊत, महेश गवळी, बबलू दळवी, बबलू काशीद, प्रकाश चौधरी, उत्तरेश्वर गायकवाड, संतोष नलवडे तसेच टेंभुर्णी शहरातील सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते