विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल
नंदुरबार: महाराष्ट्र राज्यात जवळपास सर्वच गावात नाभिक समाज वसलेला आहे. महाराष्ट्रातील कानाकोप-यातील समाजबांधव अजुनपर्यंत एकमेकांशी जोडला गेलेला नाही. आपल्या अस्तीत्वाची जाणीव अजुनही या समाजाला झालेली नाही त्यांचे ऋणानुबंध जुळलेले नाही. महाराष्ट्रात आपण संख्येने किती आहोत याची माहिती नाही, आपले महत्व काय याची जाणीव सुध्दा नाही. महाराष्ट्र राज्यात एकूण नाभिक किती ? तसेच जिल्हानिहाय, तालुकानिहाय नाभिक समाजाची संख्या किती या सर्व बाबींचे अजुनही कोडेच आहे. परंतु हे कोडे सोडवण्याची सुरूवात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयातील नाभिक समाजहीतवर्धक व कर्मचारी संस्थेचे अघ्यक्ष श्री पंकज भदाने यानी केली आहे. जवळपास नंदुरबार जिल्हयामध्ये दहा हजाराच्या वर समाजबांधव आहेत. याची नोद नाभिक समाजदर्शन पत्रीका नंदुरबार यामध्ये केलेली आहे. या उपक्रमाकरीता महाराष्ट्रातून सर्वच स्तरातील नाभिक समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा देउन त्यांचे या कार्यासाठी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed