त्या ठेकेदारांच्या मुसक्या आवळा अन्यथा कार्यालय फोडणार राजू मुळीक यांचा इशारा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5188 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

851

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी : विशाल गुरव

दहिवडी तालुक्यात महावितरण विभागाचे खाजगी ठेकेदार हे मालक झाले आहेत का ? कोणालाही न विचारता हजारो शेतक-यांच्या शेतातून खाजगी ठेकेदारांनी पोल उभे केले आहेत व तारा ओढल्या आहेत. हे तातडीने थांबवा अन्यथा महावितरण विभागाचे कार्यालय फोडू असा इशारा ग्राहक प्रबोधन समिती चे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी दहिवडी येतील पत्रकार परिषदेत दिला आहे.
एचव्हीडीएस योजना अंतर्गत माण-खटाव तालुक्यातील चालू असलेल्या आयुष इलेक्ट्रिकल व विक्रांन कंपनीच्या ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरु असून हजारो शेतकरी वर्गांच्या शेतात न विचारता पोल उभी केली आहेत तसेच अजूनही उभे करत आहेत. यांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात तसेच 2013 ला मंजुरी असलेल्या जाधव वाडी प्रकल्पाला 2015 मध्ये पूर्ण करण्याचे आदेश महावितरण विभागाने दिले होते मग ते पूर्ण का करता आले नाही. तसेच ते काम अर्धवट सोडून त्या कामाचे जोड शिंगणापूर रस्त्यालगत जुन्या लाईन वर का देण्यात आला आहे तो देखील अनधिकृतपणे का दिला आहे. एवढा सावळागोंधळ होत असताना देखील महावितरण विभागाचे दहिवडी उपविभागीय उपकार्यकारी अभियंता तसेच वडूज विभागाचे अभियंता हे डोळे बंद करून का बसले आहेत याची देखील की चौकशी करण्यात यावी अन्यथा महावितरण विभागाला याचे गंभीर परिणाम सोसावे लागते. असा इशारा देखील राजू मुळीक यांनी दिला आहे.