आदरणीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5184 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

675

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल नागपूर शहर प्रतिनिधी
आदरणीय पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह अंतर्गत आज दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रभाग ३४ ब चे नगरसेवक मा. श्री. राजेंद्र सोनकुसरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आदरणीय परमपूज्य पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांची जयंती निमित्त दक्षिण नागपूर चे अध्यक्ष मा. श्री. देवेंद्रजी दस्तुरे यांचा शुभहस्ते दिप प्रज्वलन करून व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली व लोकांना फळ वितरण करण्यात आले. प्रभाग ३४ चे नगरसेवक मा. श्री. राजेंद्रजी सोनकुसरे, सोबत दक्षिण नागपूर चे महामंत्री मा. श्री. गजेंद्रजी मोहाडीकर, मा. श्री. विनोदजी कडू सर. मा. श्री. रितेशजी पांडे, अनुसूचित जमाती हलबा आघाडी दक्षिण चे महामंत्री मा. श्री अजय वाघ प्रभाग 34 चे वॉर्ड अध्यक्ष मा. श्री. बाबारावजी तायडे व मा. श्री. कपिलजी ढोबळे, आयटी सेल प्रमुख श्री. राजेश सु. उपासे, बूथ अध्यक्ष श्री. विजयजी राठोड, श्री. प्रदीपजी मोहाडीकर, मा. श्री. मधुकरजी पसारे काका, श्री. वसंताजी बावणे, श्री वसंताजी गणोरकर, श्री नानाभाऊ आदेवार, भाजपा दक्षिण युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभमजी लोहकरे, प्रशांत इंगळे, श्री. चंद्रशेखरजी हींगणेकर व प्रकाशजी उपासनी, मंगेशजी ठाकूर, जितेंद्रजी पांडे, यासोबत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.