
विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : विदर्भातील युवकांच्या पोलिस नोकरी संदर्भात आज आम्ही सदर निवेदन मा. अनिलबाबू देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले. मा. गृहमंत्री यांनी या विषयाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. ही मागणी मान्य झाल्यास येणार-या पोलिस कांस्टेबल भरतीत विदर्भातील युवकांना फार मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्याच सोबत आदिवासी भागातील युवकांना पोलिस भर्तीत 1991च्या शासन निर्णयानुसार फार मोठा फायदा होऊ शकतो. गृहमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि विदर्भातील युवकांना न्याय द्यावा. महाविदर्भ जनजागरण चे संयोजक नितीन रोघेंनी निवेदनात विनवणी केली आहे. या वरील बाबीचा गृहमंत्र्यांनी लक्षपूर्वक या सर्व बाबींचा विचार करावा आणि विदर्भातील युवकांना न्याय मिळावा. अशी एका प्रसिद्धी पत्रकात अपेक्षा केली आहे. त्यावरील गृहमंत्र्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व आश्वासन दिले या विषयावर जरूर आपण मार्ग काढू असा सल्ला सुद्धा दिला.

