Home अमरावती वरुड शहरात मास्क न लावणा-या विरूद्ध दंडात्मक कारवाई

वरुड शहरात मास्क न लावणा-या विरूद्ध दंडात्मक कारवाई

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5175 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

169 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : वरूड तालुका प्रतिनिधी- राहुल नागपुरे
वरूड : कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत मास्क न लावता वाहने चालविणारे मास्क न लावता पायी फिरणा-या वाहनधारकांना व आज शहरात वरुड महसूल प्रशासन वरुड नगर परिषद प्रशासन वरुड पोलीस प्रशासन प्राथमिक स्वास्थ्य आरोग्य कार्यालय तालुका आरोग्य कार्यालय प्रशासन पंचायत समिती कार्यालय या सर्व शासकीय विभागाच्या सामूहिक पथकाने आज अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली यामध्ये एसडीएम नितीन कुमार हिंगोले, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक मगन मेहते, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल देशमुख, बीडीओ बाळासाहेब कनाठे प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे डॉक्टर पथक नगरपरिषद पथक या सर्वांनी मास्क न लावणा-या विरूद्ध दंडात्मक कारवाई केलेली आहे 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत वरुडच्या सामाजिक संघटनेने व्यापारी बांधवांनी हा जनता कर्फ्यु घोषित केला आहे दोन दिवस कडक बंदोबस्त ठेवण्यात आला तिस-या दिवशी मात्र अनेकांनी मास्क न लावता वाहन चालवल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोणा चा जबरदस्त प्रादुर्भाव या वरुड तालुक्यात झाल्यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांना कोरोणाची लागण झाली असुन अनेकांचा मृत्यू झालेला आहे दररोज कोरोणा संक्रमितांच्या वाढत्या आकडयाकडे पाहून व्यापा-यांनी स्वतः चार दिवसाचा बंद घोषित करण्याचा निर्णय केला आणि तशा आशयाचे निवेदन तहसीलदार मुख्याधिकारी नगरपरिषद त्यांना दिले या निवेदनाच्या आधारे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी बंदला सहकार्य करावे असे आवाहन केले होते यांच्या आवाहनानुसार आज तिस-या दिवशी शहरात कडेकोट बंद ठेवण्यात आला होता पण विनाकारण फिरणारे आणि सूचनांचे पालन न करणारे तसेच रस्त्यावर मास्क न लावता फिरणारे यांच्याविरुद्ध शासनाने कठोर पावले उचलली आणि दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.