महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे साहेब यांची अमरावती येथे आरोग्यसंबंधात विविध विषयावर चर्चा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5168 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

922

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल वरूड तालुका प्रतिनिधी: राहूल नागपूरे
आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे साहेब यांचे अमरावती येथे मा. भय्यासाहेब देशमुख तसेच आमदार देवेन्द्र भुयार यांनी केले स्वागत. अमरावती भेटी दरम्यान अनेक महत्वपूर्ण विषयावर झाली चर्चा झाली.                       वरुड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालया मध्ये श्रेणीवर्धन बृहत आराखड्यात मंजूर असलेल्या वरुड व मोर्शी तालुक्यातील उप-आरोग्य केंद्रा करिता निधी उपलब्ध करणे मोर्शी येथे उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर युनिट सुरू करण्याकरिता मंजुरी प्रदान करणे व निधी उपलब्ध करुन देणे इत्यादी विषयावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ भय्यासाहेबजी देशमुख, आमदार देवेन्द्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील, जिल्हा परीषद सदस्य राजू बहुरूपी, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, संदीप खडसे, ऋषीकेश राऊत, ज्ञानेश्वर यावले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.