Home गोंदिया दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान शहीद

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान शहीद

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5165 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

439 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल गोंदिया जिल्हा प्रतिनिधी- राधाकिसन चुटे

गोंदिया:. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश उमराव बडोले, वय ४९, शहीद झाले. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या सी.आर.पी.एफ. ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाले. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंतिम संस्कार नागपूर येथे करण्यात आले.