Home आरोग्य गोंदिया जिल्ह्यात शनिवार पासून मास्क न वापरणा-या लोकांकडून आकारणार ५०० रुपये दंड

गोंदिया जिल्ह्यात शनिवार पासून मास्क न वापरणा-या लोकांकडून आकारणार ५०० रुपये दंड

0
गोंदिया जिल्ह्यात शनिवार पासून मास्क न वापरणा-या लोकांकडून आकारणार ५०० रुपये दंड

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल गोंदिया जिल्हा प्रतिनिधी- राधाकिसन चुटे
गोंदिया:.  गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसें दिवस वाढत असून बहुतांश लोक आजही सार्वजनिक ठिकाणी किंवा बाजारात जाताना मास्क चा वापर करित नसल्याने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख हे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत गोंदियात कोरोनाचा आढावा घेण्या करिता आले असताना अनिल देशमुख यांनी मास्क न वापरणा-या लोकांकडून शनिवार पासून ५०० रुपये आकारण्यात येईल अशी घोषणा केली. मात्र स्वतः घोषणा करताना गृह मंत्री यांना मास्क लावायचा विसर पडला.  नागरीकांनी स्वताची व परीवाराची काळजी घ्यावी असे आवाहन गृहमंत्री मा. अनिल देशमुख यांनी समस्त जनतेस केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here