आशा स्वयंसेविका सौ उषा दंढाले यांचे कोविड-19 मध्ये कार्य करतांना निधन

394

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल स्थानिक प्रतिनिधी अमरावती जिल्हा

अमरावती जिल्हा उदयपूर मेंढी येथील आशा स्वयंसेविका सौ उषा दंढाले वय 36 यांचे आज कोविड-19 मध्ये सर्वे व कोविड मध्ये काम करीत असतांना 23 सप्टेंबरला अमरावती येथील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये कोरोनाची लागण झाल्याने निधन झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र आमनेर व मेंढी येथील आशा वर्कर सौ. उषा दंढाले यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. त्यांचे पती पेट्रोल पंपवर नोकरी करतात. त्यांच्यामागे बराच मोठा आप्त परीवार आहे. विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल तर्फे मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली.