Home आरोग्य काटोल तालुक्यात कोरोनाचा हाहा:कार

काटोल तालुक्यात कोरोनाचा हाहा:कार

174 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल काटोल प्रतिनिधी: वैष्णवी अतकरे

सोमवार २१ सप्टेंबर रोजी ग्रामीण मध्ये २९ तर शहरात २४ रूग्ण कोरोना बांधित आढळून आले. काटोल शहराची आकडेवारी पाहता ५५३ पैकी १२ रूग्णांचा मृत्यु झाला आहे तर ग्रामीण भागात २४० पैकी ५ रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. दोन्ही मिळून मृत्युची संख्या १७ झाली आहे. पण इतका मोठा आकडा असून सुद्धा काटोलमधील लोक कोरोनाला मनावर घेतांना दिसत नाहीत व नियमांचे पालन करतांना दिसत नाही अशी परिस्थिती पाहता काटोलमधील कोरोना बांधितांची संख्या हजारांहून जास्त झाली आहे. काटोल तालूका नागपूर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर जाणार तर नाही ना ? अशी शंका जनतेच्या मनात घर करीत आहे. याकडे प्रशासनाने विषेश लक्ष दयावे अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे पण जनतेनेसुध्दा यास सहकार्य करणे तेवढेच महत्वाचे आहे.