“कोरोना काळात काटोलमध्ये रक्तदान शिबीर”

376

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल 

काटोल प्रतिनिधी: वैष्णवी अतकरे

शेर शिवाजी संघटनेच्या वतीने नबीरा महाविद्यालय चौक. काटोल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला तरूणाईने भरघोस प्रतिसाद देत 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आज आपला संपुर्ण भारत देश कोरोनाशी लढत आहे परंतु रक्तदान शिबीर व रक्तदाते कमी झाल्याने आज रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे तो भरुन काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत असे मत शेर शिवाजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सागर राऊत यांनी त्यावेळी व्यक्त केले.