Home आरोग्य वाडी शहरात 50 खाटांचे अस्थायी कोविड निवारण केंद्र उभारण्याची वाडीवासीयांची मागणी

वाडी शहरात 50 खाटांचे अस्थायी कोविड निवारण केंद्र उभारण्याची वाडीवासीयांची मागणी

0
वाडी शहरात 50 खाटांचे अस्थायी कोविड निवारण केंद्र उभारण्याची वाडीवासीयांची मागणी

विदर्भ वतन न्युज पोर्टल वाडी प्रतिनिधी – अमित हुस्नापुरे 

वाडी:राज्यात अनलॉक कालावधी सुरू झाल्यानंतर गोदाम नगरी असलेल्या वाडी शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यापारामुळे दळणवळण असलेल्या शहरात समूह संसर्गामुळे कोरोना संसर्गाचा विस्फोट होऊन शहरातील आजपावेतो 25 च्या वर कोरोना बाधितांचा केवळ शासकीय आरोग्य यंत्रणा अपुरी असल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून 600 चे वर स्थानिक नागरिक बाधित असून दिवसेंदिवस आकड्यात सतत वाढच होत आहे.शासकीय यंत्रणा हतबल झाल्यामुळे साधा प्राथमिक उपचार मिळणे कठीण झाल्याने लोकांत भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक लाखाच्यावर वर लोकसंख्या, नागपूर ग्रामीण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या शहराकरिता 100 खाटांचे सर्व सुविधायुक्त शासकीय रुग्णालय असावे यासाठी मागील 7 ते 8 वर्षांपासून स्थानिक राजकीय,सामाजिक संघटना यांनी वारंवार धरणे, आंदोलने करून शासनदरबारी आपली कैफियत मांडली व स्थानिक नवनीत नगर येथील शासकीय मोकळ्या जागेवर शासकीय रुग्णालय मंजूर करून घेतले परंतु प्रत्यक्ष त्या कामाला आजपावेतो सुरुवात न होणे ही फार मोठी शोकांतिका आहे. सद्यस्थितीत वाडी शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून स्थानिक सर्व पक्ष, सामाजिक संघटना एकत्र येऊन आलेल्या संकटाचा सामना व त्यावर मात करण्यासाठी कोरोना प्रादुर्भाव व नियंत्रण सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करून जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितीन राऊत यांना नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात वाडी नगर परिषद अंतर्गत कोरोना बाधितांवर अत्यावश्यक उपचार करण्यासाठी 50 खाटाचे अस्थायी आक्सिजन पुरवठा युक्त कोविड उपचार केंद्र,वाडी परिसरातील सर्व खाजगी रुग्णालय नियमित सुरू ठेवण्यासाठी सक्तीचे निर्देश, अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या रुग्णालयावर दंडात्मक कार्यवाही, कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचार, ऑक्सिमिटर नि:शुल्क उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहड व वाडी स्थित कोरोना स्वेब केंद्र तसेच नगर परिषदेला आवश्यक उपचार साहित्य व मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध करून देणे तसेच शहराकरिता शासन दरबारी मंजूर असलेला 100 खाटाचे रुग्णालयाचे काम विनाविलंब सुरू करणे आदी मागण्याचा समावेश होता.  यावेळी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण सर्वपक्षीय कृती समितीचे प्रेमनाथ झाडे, प्रकाश कोकाटे, संजय अनासाने, श्याम मंडपे, मधू मानके, वसंता इखनकर, राजेश थोराने, अश्विन बैस, राजेश जंगले, रुपेश झाडे, संतोष केचे, केशव बांदरे, दुर्योधन ढोणे, हरीश हिरणवार, राहुल सोनटक्के, चंद्रशेखर देशभ्रतार, कमल कनोजे, मनोज रागीट, राजेश जीरापुरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
फोटो:तहसीलदार मोहन टिकले यांना निवेदन देताना सर्व पक्षीय कृती समिती पदाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here