3 वर्षासाठी लोकजागर पार्टीची नवीन कार्यकारिणी घोषीत

241
विदर्भ वतन न्युज पोर्टल
नागपूर प्रतिनिधी : लोकजागर पार्टीच्या सर्व समित्या आधीच बरखास्त करण्यात आल्या होत्या. शिवाय नवा संघटनात्मक ढाचा जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आता प्रदेश अध्यक्ष पद राहणार नसून त्याऐवजी प्रदेश संयोजक हे पद निर्माण करण्यात आले आहे. शिवाय मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे विभाग करण्यात आले असून, प्रत्येक विभागाची  स्वतंत्र कार्यकारिणी राहणार आहे. त्याप्रमाणे काही नियुक्त्या आज घोषित करण्यात येत आहेत.
• मनीष नांदे – प्रदेश संघटन सचिव
• डी. व्ही. पडिले, प्रदेश संयोजन समिति सदस्य
• डॉ. किशोर सुरडकर, प्रदेश संयोजक, आरोग्य लोकजागर
• भरत पांडे, कार्यालयीन सचिव, महाराष्ट्र प्रदेश, लोकजागर पार्टी
• रवींद्र रोकडे, संयोजक, मुंबई विभाग
• समीर देसाई, संयोजक, कोकण विभाग
• राजकुमार डोंबे, संयोजक, पश्चिम महाराष्ट्र
• प्रभाकर वानखडे, संयोजक, लोकजागर आय. टी. सेल, अमरावती विभाग
• महेंद्र शेंडे, संयोजक, नागपूर जिल्हा, ग्रामीण
• भूमेश शेंडे, संयोजक, गोंदिया जिल्हा
• चंद्रकांत टेरे, संयोजक, बुलढाणा जिल्हा
• चेतन शर्मा, संयोजक, चंद्रपूर जिल्हा
बाकी नियुक्त्या लवकर करण्यात येतील.
ज्ञानेश वाकुडकर
संस्थापक अध्यक्ष
लोकजागर पार्टी