Home नागपूर सिटू चे शेकडो आशा कामगार न्याय मागण्यासाठी संविधान चौकात रस्त्यावर

सिटू चे शेकडो आशा कामगार न्याय मागण्यासाठी संविधान चौकात रस्त्यावर

0
सिटू चे शेकडो आशा कामगार न्याय मागण्यासाठी संविधान चौकात रस्त्यावर
विदर्भ वतन न्युज पोर्टल, स्थानिक प्रतिनिधी:
नागपूर दि. २३ सप्टेंबर
महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सी.आय.टी.यू. तर्फे राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी नावाने जो कार्यक्रम १५ सप्टेंबर पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र भर आशा व गटप्रवर्तकां च्या प्रचंड उद्रेक व तक्रारी समोर येत आहेत. तिघांची टीम करून कुठेच कामास सुरवात झालेली दिसत नाही, आरोग्य स्वयंसेवक दिला जात नाही व आशानाच ते त्यांच्या कुटुंबातील एकाचे नाव देण्याची जबरदस्ती करताना दिसत आहेत. तसेच त्यांचे  मानधन देण्यासाठी पुष्कळ ठिकाणी नकार देताना प्रशासन दिसत आहे. सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांनी या बाबत कुठेच पुढाकार घेऊन आशाना मदत करताना दिसत नाहीत. उलट सर्वत्र जबरदस्ती व दबाव टाकून कामे लादली जात आहेत. सर्वत्र सुरक्षा साधनांचा अभाव असून कार्यक्रम राबविण्या साठी बहुतांश  साहित्य अद्यापही दिले गेलेले नाहीत. आशांकडे अँड्रॉईड मोबाइल नसताना व बहुतांश आशाना प्रशिक्षण नसताना रिपोरटिंग करण्यासाठी तगादा लावला जात आहे. गटप्रवर्तक टीमवर्क मध्ये सामील नसताना रिपोरटिंगचे काम व सर्वेक्षणाचे काम दिले आहे. तुटपुंज्या मानधनावर  रोज ५० घरांचे सर्वेक्षण करणे म्हणजे 10 ते 12 तास कामं करून  स्वतःची व  कुटुंबातील सर्वांची पिळवणूकच करण्यासारखे आहे, म्हणून कृती समिती मार्फत या बाबत आज शासनास पत्र लिहून जाब विचारण्याचे ठरले आहे. २३ तारखेला काळया फिती लावून सकाळी ११ वाजता संविधान चौक, नागपूर येथे आंदोलनं केले. तसेच 23 तारखे पासून काळ्याफिती लावून जमेल तेवढेच  काम करण्याचे व शासनाने तातडीच्या या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास तीन दिवसीय लाक्षणिक संप 28 सप्टेंबर पासूनच करू अशी तातडीची संपाची नोटीस ही देण्याचे ठरवले आहे. तशी संपाची नोटिस आपण सर्व  पातळीवर म्हणजे दिनांक २३ सप्टेंबरला जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर, आरोग्य केंद्र, नगर व महानगरपालिका स्तरावर देणार. सदर कार्यक्रम आमलात आणण्या करिता व शासनास आपले प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी भाग पाडू.जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर संपाचा इशारा सुद्धा देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व  प्रीती मेश्राम महासचिव व राजेंद्र साठे अध्यक्ष यांनी केले. आंदोलनात रंजना पोऊनिकर, पौर्णिमा पाटील, नंदा लिखार, रुपलता बोंबले, अंजु चोपडे, मनिषा बारस्कर, मंदा गंधारे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here