Home आरोग्य राज्यातील पहिले पत्रकार कोरोना केअर सेंटर साताऱ्यात

राज्यातील पहिले पत्रकार कोरोना केअर सेंटर साताऱ्यात

279 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी – विशाल गुरव

सातारा- कोरोना बाधित पत्रकारांना होम आयसोलेशनला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सातारा जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घेऊन साताऱ्यातील यवतेश्वर परिसरातील हॉटेल निवांत येथे पत्रकारांसाठी चे केअर सेंटर सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी पत्रकारांनीच उभे केलेले हे पहिले कोरोना केअर सेंटर (आयसोलेशन)आहे.
साताऱ्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजाराच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या 900 च्या पुढे केले आहे साताऱ्यात फिल्डवर व कार्यालयात काम करणाऱ्या पत्रकारांना पुरणाची बाधा झाली आहे कोरोना बाधा झाली आहे त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत मात्र पत्रकार कोरोना बाधित झाल्यानंतर स्वतंत्र होम आयसोलेशन ची सुयोग्य व्यवस्था नसल्याने साताऱ्यातील पत्रकारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. सातारा जिल्हा पत्रकार संघाने त्यावर तोडगा काढत साताऱ्यातील हॉटेल निवांत येथे 16 बेडचे दोन ऑक्सिजन मशीन युक्त कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा संकल्प सोडला ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब जाधव व चंद्रसेन जाधव यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातारा जिल्हा पत्रकार संघाने हॉटेल निवांत येथे कोरोना केअर सेंटरचा प्रारंभ केला.
यावेळी प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला,जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुजित आंबेकर, दिपक राहुल, तपासे ओंकार कदम,दिक्षित राहुल तपासे, ओंकार कदम, तुषार कपासे,तबरेज बागवान प्रमोद इंगळे,सिद्धार्थ लाटकर तालुका वैद्यकीय अधिकारी दादासाहेब पवार आरोग्य कर्मचारी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
सातारा जिल्हा पत्रकार संघाने प्रशासनाच्या सूचनेनुसार नियमावली तयार केली असून त्यानुसार साताऱ्यातील ज्या पत्रकारांना ग्रहविलगीकरणाची (होम आयसोलेशन) सोय नाही अशाच गरजू कोरोना बाधित पत्रकारांसाठी ही व्यवस्था आहे खा.श्री. छ. उदयनराजे भोसले व उद्योजक सागर भोसले यांच्यामार्फत या कोरूना केअर सेंटरवर पत्रकारांसाठी दोन ऑक्सीजन मशीन ची व्यवस्था करण्यात आले तर आरोग्य विभागामार्फत एक डॉक्टर व दोन नर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत होम आयसोलेशन किट सेंटरवर ठेवण्यात आले आहे वृत्तपत्र अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या व्यवस्थापनामार्फत यांची पत्रकार छायाचित्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया चे रिपोर्टर म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी आहे अशाच पत्रकारांना या सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. असे जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केले आहे पत्रकारांसाठी पत्रकारांनी तयार केलेले हे पहिली कोरोना केअर सेंटर असल्‍याने सातारा जिल्हा पत्रकार संघाचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी कौतुक केले तर सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी आभार मानले.