झुल्लर गावात राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी तर्फे पुरग्रस्त लोकांना अन्नधान्य, किराणा व ब्लॅंकेट चादरीचे वाटप

369

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर जिल्हा ग्रामिण प्रतिनिधी

दिनांक 28/08/2020 ला कन्हान डूमचे पाणी कन्हान नदीत सोडण्यात आले त्याची माहिती गावक-यांना रात्री 11 वाजता देण्यात आली त्यामुळे गावक-यांना घर सोडुन सुरक्षित जागी जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. या पुरामध्ये गावक-यांचे घरातील सर्व साहित्य, जनावरे व आवश्यक वस्तु वाहून गेल्या अशा परिस्थितीत दिनांक 19 सप्टेंबर 2020 रोजी स्थानिक गावक-यांना उपजिविकेसाठी रा.ज.पा. चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेशजी काकडे व मित्रपरिवाराने स्थानिक 107 गावक-यांना अन्नधान्य, किराणा, ब्लॅंकेट, चादर व साडी लुगडयाचे वाटप करण्यात आले.
पुरग्रस्त गावक-यांसाठी आवश्यक सामुग्री घेऊन जाणा-या गाडीला सुरूची मसाल्याचे संचालक श्री प्रकाशजी कटारीया यांनी हिरवी झेंडी दाखवुन गाडी रवाना केली यावेळी श्री सुभाष मुनोत, श्री रमेश मोहनाने, श्री प्रताप वासनिक, उपस्थित होते. झुल्लर या गावामध्ये साहित्य वाटप करतेवेळी राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य जनाब जैनउल्ला शाह, श्री अजय शर्मा, श्री प्रविण उराडे, श्री हरिष निमजे, सौ प्रिती डंभारे, विदर्भ महिला अध्यक्षा सौ अमिता भिवगडे, वडोदा सर्कल अध्यक्ष श्री सोपान वानखेडे, श्री संजय अंबाडकर, श्री सुर्यकांत चैधरी हे उपस्थित होते तर श्री रोशन शाहू, श्री शिवप्रसाद राऊत, श्री प्रविण डंभारे, सौ सुचिता मांगलेकर, सौ लिना येरपुडे, सौ मनिषा घोडमारे, अभिलाषा पाटील, सौ रूपाली वाघ, कुमारी मनस्वी काकडे, कुमारी शारदा सतिबावणे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला झुल्लर गावचे माजी सरपंच श्री ज्ञानेश्वरजी वानखेडे, ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन श्री वसंतजी काकडे, नागपूर जिल्हा ग्रामिण अध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शिवप्रसाद राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व मान्यवर बंधु भगिनी उपस्थित होते.