गरजू, निराधार मुलांना सह्याद्रीचा दुर्गसेवक व लोकसहभागातून एक हात मदतीचा

382

विदर्भ वतन न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी- विशाल गुरव

गरजू अनाथ, मतिमंद, निराधार मुलांसाठी नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या अश्विनीताई वेताळ यांच्या शांताई फाउंडेशन संस्थेची पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून सह्याद्रीचा दुर्गसेवक यांनी पाहिली  व क्षणाचाही विलंब न करता सर्व सह्याद्रीच्या दुर्गसेवकातून व लोकसहभागातून मदत गोळा केली आज अखेर रुपये 4,880 गोळा झाले.
सर्व सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांनी मिळून गोळा झालेल्या रक्कम मधून किराणा माल व साहित्य खरेदी करून शांताई फाउंडेशन संस्थेच्या अश्विनीताई वेताळ यांच्या हाती सुपूर्त केले.
आज पर्यंत कोल्हापूर-सांगली महापूर, गडकिल्ले संवर्धन, थोर पुरुषांच्या जयंत्या,निसर्ग चक्रीवादळ,शालेय मुलांना वस्तू खाऊ वाटप यासारख्या धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यातून सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांना आपले सहकार्य व मदत केली आहे.