Home नागपूर प्रा .किरण ना.पेठे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रा .किरण ना.पेठे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

0
प्रा .किरण ना.पेठे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

विदर्भ वतन न्युज पोर्टल

नागपूर-दि.५-(रयतेचा वाली नागपूर जिल्हा प्रतिनिधी कविता विभाग )माननीय प्रा.किरण पेठे या कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज येथे अर्थशास्त्र विषय अध्यापणाचे कार्य आठ वर्षांपासून सतत करत आहे .त्यांना लेखन कार्यात आवड आहे.सोबतच कोरोना काळात त्यांनी कविता लिखाणाचा कार्यक्रम जोपासला असून त्या एक उत्तम कवयित्री आहेत.त्यांच्या जवळपास दीडशेहून अधिक कविता लिखाण आहे, सोबतच चारोळ्या लिहिणे लेख लिहिणे अश्या उपक्रमात त्या अतिशय आवडीने आणि उत्स्फूर्तपणे सतत भाग घेत असतात. अध्यापन बरोबरच साहित्य क्षेत्रातील लिखाण विविध वर्तमानपत्र,काव्यसंग्रह यातून प्रकाशित झाले आहे.त्या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून अध्यापन,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,त्यांना मदत करण्याचे काम सातत्याने करीत असतात.त्या रयतेचा वाली डिजिटल शैक्षणिक दैनिक वृत्तपत्राच्या नागपूर जिल्हा प्रतिनिधी (कविता विभाग )म्हणून कार्यरत आहेत .तसेच अग्निपंख फौंडेशन च्या कामठी जिल्हा समनवयक आहेत.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यवतीने दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा घेण्यात येतो.यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२० हा पुरस्कार मा.कु.किरण नामदेवराव पेठे याना देण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम ओनलाईन झूम मीटिंग एप वर घेण्यात आला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने *राज्यस्तरीय ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी झूम अँप वर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत संपन्न झाला. या पुरस्कार मानकऱ्यांना ऑनलाईन सोहळ्यात प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये(सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानाचा फेटा आणि मानकरी बॅच) प्रदान करण्यात आले.हा पुरस्कार मान्यवरांना घरपोच उत्तम पॅकिंग बॉक्सने पाठविण्यात येणार आहे.शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाहीर पुरस्कारात याअगोदर त्यांना आधुनिक सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२० याने गौरविण्यात आले आहे.
याचे श्रेय त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बागडे सर,उपप्राचार्य श्रीमती भौमिक मॅडम,पर्यवेक्षक डॉ.अग्रवाल सर तसेच सतत मार्गदर्शन करणारी त्यांची आई आणि त्यांचे पती दीपक तळखंडे व सतत प्रेरणा देण्याचे कार्य करणारी त्यांची मुलगी यशस्वी हिला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here