भारताच्या कांदा निर्यात बंदिचा बांग्लादेश कडून निषेध. प्रा सतिश राऊत

500

विदर्भ वतन न्युज पोर्टल जिल्हा प्रतिनिधी श्रीरामपूर अहमदनगर : अक्षय तेल्होरे : भारत सरकारने अचानक केलेल्या कांदा निर्यात बंदिने महाराष्टातील शेतक-यांप्रमाणेच बांग्लादेश सुध्दा हैराण झाला आहे.
मातीमोलाने विकावे लागलेले कांद्दाचे दर वाढू लागताच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीकेली. असे करण्यापूर्वी बांग्लादेशास पुर्व कल्पना दिली जाईल असा सामंज्यस्य अलिखीत करार भारत व बांग्लादेश यांच्यात होता. परंतु भारत सरकारने भारतीय शेतक-या बरोबरच बांग्लादेशच्या तोंडाला सुध्दा पाने पुसली. संतप्त बांग्लादेशाने याबाबत भारतसरकार कडे निषेध व्यक्त केल्याच्या बातम्या बांग्लादेश मध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. आपल्या शहरी वर्गाचे हित संबध सांभाळण्या साठी कीतीही शेतक-यांनी फाशी घेतलीतरी चालेल ही निर्ठावलेली प्रव्रत्ती पुन्हा समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील शेतक-याचे दुहेरी नुकसान आहे. या धरसोड धोरणामुळे बांग्लादेश सारखे हक्काचे मार्केट आपणास गमवावे लागेल. जगात इतर देश बाहेरील मार्केट मिळविण्याचा आटोकाट प्रयत्नकरत आहेत. दुर्दैवाने भारतात मात्र विपरीत न्याय आहे. ही भयानक गोष्ट आहे.