Home आरोग्य शालिनीताई मेघे रूग्णालय व अनुसंधान केंद्र, वानाडोंगरी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी

शालिनीताई मेघे रूग्णालय व अनुसंधान केंद्र, वानाडोंगरी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी

438 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल
नागपूर : स्थानिक प्रतिनिधी नागपूर

दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी श्री विदयाधर पिंजरकर, राहणार उधोजी रोड संघ बिल्डींग, महाल नागपूर यांचा शालिनीताई मेघे रूग्णालय व अनुसंधान केंद्र, वानाडोंगरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या उपचारामध्ये हयगय करण्यात आली असून त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करण्यात आले नाही असा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला आहे. संबंधीत डाॅक्टरांवर व रूग्णालयावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याची माहिती अशी की श्री विद्याधर पिंजरकर यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 ची चाचणी करण्यात आली असता त्यांचा रिपोर्ट पाॅझीटिव्ह आला त्यामुळे मनपा तर्फे त्यांना शालिनीताई मेघे रूग्णालय व अनुसंधान केंद्र वानाडोंगरी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांनंतर त्यांची दुसरी चाचणी करण्यात आली तर ती रिपोर्ट नेगेटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले उपचारादरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता कुटूंबियांनी त्यांना व्हेंटीलेटरवर घेण्यास सांगीतले परंतू डाॅक्टरांनी काहीच एैकले नाही तसेच वारंवार सांगितल्यावरही डाॅक्टरांनी हेतूपुर्वक दुर्लक्ष केले. त्यांचा एक्सरे काढण्यास सांगितले तर मशिन खराब असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोणतीही चाचणी न करता त्यांना निमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. शेवटी त्यांची प्रकृती जास्तच खालावल्यामुळे त्यांना आयसीयु मध्ये हलविण्यात आले आणि तरीही त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आले नाही व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशा निष्काळजी डाॅक्टर व कर्मचा-यांवर त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी श्रीमती वैशाली पिंजरकर यांनी केली आहे.