भुगोल शास्त्र व पर्यावरण शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिन साजरा

424

विदर्भ वतन न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी: विशाल गुरव

दहिवडी. भुगोल शास्त्र व पर्यावरण शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत जागतिक ओझोन दिन बुधवार दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा. प्रा. डॉ. रामराजे माने. देशमुख छ. शिवाजी कॉलेज, सातारा, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्र. प्रा. डॉ. बी. एस. बलवंत, दहिवडी कॉलेज दहिवडी. यांच्या उपस्थितीत झाला.
जागतिक ओझोन दिनानिमित्त प्रा. डॉ. रामराजे माने देशमुख यांचे नैसर्गिक आपत्ती मानवी जीवनावर होणारे परिणाम या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान कला वाणिज्य B.Voc. या विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. व्ही. पी. गायकवाड, विभाग प्रमुख मा. प्र. प्रा. डॉ. बी. एस. बलवंत प्रा. डॉ. एस. पी. दिवटे समन्वयक प्रा. डॉ. एस. एम. खेत्रे, समन्वयक अग्रणी महाविद्यालय प्रा. एस. आर. सोबान प्रा. डी. जी. गोरड यांनी आयोजित केले होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.