तुकाराम मुंढेची नागपुरात पुन्हा मनपा आयुक्त पदावर नियुक्ती करा : शिवसेनेची मागणी

520

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर प्रतिनिधी

नागपूर: दक्षिण नागपूर प्रभाग 34 मधील, शिवसेना उपशहरप्रमुख दिपक अशोकराव पोहनेकर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आपल्या स्वहस्ताक्षरात पत्र लिहून विनंती केली आहे की नागपुरात कोरोना विषाणू व्हायरसने व हाहाकाराने थैमान माजवला आहे गेल्या पंधरा दिवसात कोरोनाने खूप लोक मृत्युमुखी पडलेत. मृत्युमुखी पडणा-या रुग्णांसह आतापर्यंत 1753 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच संक्रमित रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे. नागपूरची स्थिती भयंकर झाली असून या सर्व युवक कार्यकत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात रुजू करण्यात यावे. अशी विनंती निवेदनात केलेली आहे नागपुर शहरातून तुकाराम मुंढे यांना मनपा आयुक्त पदावरून कमी करून त्यांची बदली करण्यात आली. जवळ जवळ पंधरा, तीन हप्ते झाले असून कोरोनाने कहर माजवला आहे. आज नागपूरच्या जनतेला तुकाराम मुंढे यांची आठवण झाली आहे. नागपूरची परिस्थिती हाता बाहेर चालली आहे. साधारण जनतेची लूट मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची लूट सुरू आहे. आणि लोकांच्या जीवाशी खेळणे सुरू आहे. ही परिस्थिती फक्त एकच व्यक्ती सांभाळू शकते ती म्हणजे मा. तुकाराम मुंढे साहेब. नागपूरातील नागरिकांची, स्थायी लोकांची व सर्व जनतेची विनंती आहे की पुन्हा नागपुरात तुकाराम मुंढे साहेबांची नियुक्ती करण्यात यावी व नागपूरच्या जनतेला न्याय देण्यात यावा अशी विनंती शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिपक पोहनेकर यांच्या तर्फे एका प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.