
विदर्भ वतन न्युज पोर्टल
नागपूर : गृहअर्थशास्त्र असोसिएशनद्वारे दिनांक 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2020 पर्यंत ‘‘पोषा सप्ताह‘‘ निमित्त सात दिवसीय वेब काॅन्क्लेव आयोजित कर यात आलेला होता. सद्यःपरिस्थितीला म्हणजे कोरोना ला लक्षात घेवून सर्वसामान्यांपर्यत जनजागृती पर माहिती पोहचविणे हे या सात दिवसीय कार्यक्रमाचे उद्दीष्ट होते. कोरोना किंवा कोविड-19 मुळे सर्वसामान्य एकत्र येवू शकत नसल्याकारणाने वदसपदत च्या माध्यमातून हा उपक्रम करण्यात आला. पोषा सप्ताहाच्या माध्यमातून या सात दिवसीय श्रृंखलेतील पहिले पुष्प 1 सप्टेंबर 2020 ला उद्घाटनाच्या कार्यक्रमाने गुंफण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष, श्रीनिकेतन महाविद्यालय नागपूर च्या प्राचार्य, डाॅ. सौ. श्रीबाला देशपांडे लाभल्या. गृहअर्थशास्त्र असोसिएशन कोर कमिटीच्या अध्यक्षा डाॅ. साधना क-हाडे, विभाग प्रमुख, व्हि.एम.व्ही महाविद्यालय, नागपूर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हाून Consulting Nutritionist Convener Net Pro Fan NC च्या डाॅ. रेाूका माईंदे या लाभलेल्या होत्या. डाॅ. साधना क-हाडे यांनी पोषण सप्ताहाच्या सात दिवसीय श्रृंखलेच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख वक्ता डाॅ. रेाूका माईंदे यांनी ‘‘मानसिक स्वास्थ्य व पोषण‘‘ याबाबत मार्गदर्षन केले. पोषण सप्ताहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व्हि.एम.व्ही महाविद्यालयाच्या सहाय्यक अधिव्याख्याता डाॅ. सिमा पांडे यांनी केले.
2 सप्टेंबर 2020 रोजी पोषण सप्ताहाच्या श्रृंखलेतील दुसरे पुष्प गुंफले गेले. प्रस्तुत कार्यक्रमांकरीता प्रमुख वक्ता म्हाून लाभलेल्या डाॅ. मिनल भोयर, Head Dietician, Seven Star Hospital, Nagpur यांनी “Eat Right Bite By Bite’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन वसंतराव नाईक शासकिय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूरच्या गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. अनुराधा निसळ यांनी केले. पोषण सप्ताहाचे तिसरे पुष्प दि. 3 सप्टेंबर रोजी गुंफले गेले. या करीता विषय होता ‘‘इम्युनिटी बुस्टर‘‘ यावर मार्गदर्शन करण्याकरीता ICDS, Lonara च्या Ex-Principal लाभल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केवलरामानी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका चेतना भट यांनी केले.
दि. 4 सप्टेंबर रोजी चैथे पुष्प गुंफले गेले. यामध्ये “ICT And Nutrition’ या विषयांवर मार्गदर्शन करण्याकरीता नागपूर येथील प्रसिध्द Ophthalmic Surgeon and Eye Specialist डाॅ. वैशाली सुंदरकर या लाभल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्रीमती बिंझाणी महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. शुभांगी कुकेकर यांनी केले.
सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन होय. या दिवसाचे औचित्य साधुन सात दिवसीय श्रृंखलेतील पाचव्या पुष्पाकरीता ‘‘शिक्षक व विद्यार्थी बदलते संबंध‘‘ याविषयांवर माहिती देण्यात आली. त्याकरीता वक्ता म्हणून वसंतराव नाईक शासकिय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूरच्या संस्कृत विभागातील प्राध्यापक डाॅ. पल्लवी कर्वे लाभल्या होत्या. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सेवादल महिला महाविद्यालय नागपूर येथील सहा. अधिव्याख्याता डाॅ. प्रभा चिंचखेडे यांनी केले.
सात दिवसीय या कार्यक्रमाच्या समारोपाकरीता अॅड. शैलेष चपळगांवकर, औरंगाबाद ज्युरीडिक्षन हायकोर्ट मुंबई, हे प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणुन लाभले होते. त्यांनी ‘‘सामाजिक आरोग्य‘‘ याविषयांवर मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणून लाभलेल्या डाॅ. श्रीबाला देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकांत गृहअर्थशास्त्र असोसिएशनच्या उद्देशांबाबत व कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डाॅ. सिमा पांडे यांनी केले.
अशाप्रकारे पोषण सप्ताहानिमित्त घेतलेल्या या सात दिवसीय श्रृंखलेला यशस्वीतेत कार्यकारीणी व 544 सहभागी यांचे योगदान आहे. कार्यकारीणी सदस्य डाॅ. वैजयंती देशपांडे, डाॅ. श्रीबाला देशपांडे, डाॅ. कांचन किटे, डाॅ. स्मिता पत्तरकिने, डाॅ. विद्या ठवकर, डाॅ. साधना क-हाडे, डाॅ. शुभांगी कुकेकर, डाॅ. अनुराधा निसळ, डाॅ. मृणाल वलिवकर, डाॅ. महिदा शेख, डाॅ. सिमा पांडे, डाॅ. प्रभा चिंचखेडे, प्रा. चेतना भट, डाॅ. मृणाल बंड इ. सर्वांचे विषेष योगदान लाभले. सात दिवसीय पोषण सप्ताह वेब काॅन्क्लेव यशस्वीतेने पार झाला.

