Home आरोग्य वाडी वाशीयांची कोविड केअर सेंटर ची मागणी

वाडी वाशीयांची कोविड केअर सेंटर ची मागणी

0
वाडी वाशीयांची कोविड केअर सेंटर ची मागणी

विदर्भ वतन न्युज पोर्टल
वाडी : स्थानिक प्रतिनिधी : कोरोना आज भारतातील प्रत्येक नागरीकांसाठी जीवघेणा ठरला आहे. आज खरी गरज जागोजागी कोवीड सेंटर उभारण्याची वाडी, हिंगणा परिसरातील गावात कोरोना चे रूग्ण झपाट्याने वाढत आहे.  एक एका दिवशी ४० – ४० रुग्ण कोरोना बाधीत आढळत आहे, तसेच मृत्यूचे प्रमाण दर दिवशी दोन पेक्षा अधिक  आहे. वाडीतून नागपूरला पाठविलेला कोरोना बाधीत रूग्ण बेड अभावी मृत्यूच्या दारात जात आहे. वाडी परिसरात कोवीड सेंटर उभारल्यासाठी प्रयत्न केल्यास सहज शक्य आहे. वाडीतील शासकीय शाळा, वाडीतील हॉल व नगर परिषदची असलेली रिकामी जागा या ठिकाणी तात्पुरते कोवीड सेंटर उभारण्यासाठी तसेच वाडीतील अभिजित सोसायटी लगत असलेली जागा किंवा आठवा मैल, नवनीत नगर मध्ये डिफेन्स फॅक्टरीची जवळपास १० एकर जागेवर तात्पुरता दवाखाने उभे केले तर वाडी, आठवा मैल, नवनीत नगर, हिंगणा एमआयडीसी परिसरातील नागरीकांना येथेच सोय करता येईल वाडी परिसरात रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहे तर योग्य उपचाराअभावी अनेकांचा मृत्यु होत आहे. तालुक्यातील शहरी भागा बरोबरच कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला असल्याने ग्रामीण भागातील लोक भयभीत झाले आहे. तेव्हा प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

स्थानीय नागरिक, सामाजिक संघटना व काही पक्षांकडून वाडीतील कोरोना केयर सेंटर झाले पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे

स्थानीय नागरिकांच्या प्रतिक्रिया

  • जिल्ह्यातील कोव्हिड़ रुग्ण संख्या बघता आपल्या परिसरात शक्य होईल तिथे सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे का होईना कोव्हिड़ उपचार सेंटर उभे राहणे गरजेचे आहे. आपले गाव आमचीच जिम्मेदारी स्तरावर आपण सर्वानी मिळून सर्व पक्ष राजकारण बाजूला सारुन सामाजिक बांधिलकी जपता उपरोक्त विषयावर एकत्र येवूण पूढाकार घेणे आवश्यक आहे : मनोज रागीट सामाजिक सामाजिक कार्यकर्ता
  • वाडी येथिल जनसंख्या व रुग्ण संख्या लक्षात घेता कोविड वर आळा घालण्यासाठी कोविड सेंटर ची स्थापना करणे फारच गरजेचे आहे याकरीता सामाजिक संघटनेने पुढे येण्याची अत्यंत गरज आहे ण्
    माझ्या ग्रुप द्वारे काही मदत लागल्यास आम्ही मदत करू : सिरील पेद्रो सामाजिक कार्यकर्ता
  • आज पर्यंतचा आकड़ा पहिला तर कोरोना ग्रसित रुग्ण वाढतच आहे, त्याच्या भरपूर फायदा नागपुर आणि वाड़ीचे काही खासगी दवाखाने पूर्णपणे उचलत आहे.  40 ते 50 हजार रु रोजचा पैकेज देत आहे कोविडची अनुमति नसुन सुदधा त्या नावावर पैसे लुबाड़त आहे जर त्यांच्या दवाखान्यातून पेशंट हलवला तर लागलेला ऑक्सीजन सुध्दा काढून घेतात नागपुर ला तपासणी करिता 8 हजार रूपये एम्बुलैंसचे भाड़े आकारले जाते, वाडीतील सामाजिक तथा राजकारणी लोकांनी राजकारण न करता वाड़ी मधे कोविड दवाखानाची मागणी करण्यास सर्वानी एकत्र आले पाहिजे, सरकारी निम्नसरकारी शाळा, कॉलेज ला कोविड सेंटर म्हणून उपयोगत आणु शकतो, किवा दूसरा पर्याय शोधता येतो : राहुल सोनटक्के सामाजिक कार्यकर्ता
  • वाडी मध्ये कोव्हिड़ संख्या बघता नगर परिषद कडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर रूग्णासाठी ऑक्सीजनरहीत रूग्णालय स्थानिक व्यवस्था करावी अन्यथा वाडी विकास समिती आंदोलनाचा ईशारा या निमित्त देत आहोत : अमित हुसनापुरे सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here