Home कृषिसंपदा कृषी विभागाकडून आलेल्या युरियाचा गैरवापर व काळाबाजारी थांबवा : नागपूर जिल्हा...

कृषी विभागाकडून आलेल्या युरियाचा गैरवापर व काळाबाजारी थांबवा : नागपूर जिल्हा शिवसेनेची मागणी

88 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर जिल्हा स्थानिक प्रतिनिधी
नागपुर जिल्ह्यामधे युरियाचा तुटवडा वाढत आहे प्रत्येक वर्षी शेतक-यांना यूरियाचे खत 51000 मेट्रिक टन लागते आणि आतापर्यंत 44000 मेट्रिक टन आलेले आहे. तरीही 50 टक्के शेतक-यांना अजुन युरियचा एकही दाणा मिळालेला नाही. अश्या परीस्थितीत 44000 मेट्रिक टन युरिया गेला कुठे अशी विचारणा सिध्दुजी कोमजवार यांनी कृषी अधिक्षक यांच्याकडे केली.
युरिया सेवा केंद्राकडे असल्यावरही शेतक-याना वाढीव दरामध्ये विकल्या जातो व त्याची पक्की पावतीही देत नसल्याचे निदर्शनास आले आहे
स्थानिक कृषी सेवा केंद्रातील चालक या युरीयाचा काळाबाजार करून काही मोठ्या डेअरी फ़ार्मवाल्यांना विकतात व त्याचा वापर दुध, पनीर बनविण्याकरिता होतो असा संशय त्यांनी व्यक्त केला. अश्या परीस्थितीमधे सर्व कृषी सेवा केंद्रामधे ग्रामीन कृषी अधिकारी यांनी लक्ष ठेवावे व कडक कार्यवाही करावी आणि शेतक-यांना मुलभुत प्रमाणात त्यांना युरिया मिळावा याकडे लक्ष दयावे अशी विनंती करण्यात आली यावेळी  सिध्दूजी कोमजवार, आशिष देशमुख, दिपक पोहनेकर, सागर चरडे, विनोद शाहू, कार्तिक नारनवरे, प्रविण देशमुख, राजेश वाघमारे, सुरेश कदम, शंकर बेलखोडे, जितू गभने, अक्षय वाकडे, अजय गायकवाड, शैलेंद्र आंबिलकर, हिमांशु ठाकरे तसेच इतर शिवसैनिक’ उपस्थित होते.